Kitchen Jugaad: स्वयंपाक करताना सर्वात कंटाळवाणं आणि वेळ लागणारं काम कोणतं विचारलं तर कुणीही सांगेल ते म्हणजे लसूण सोलण्याचं. लसणीच्या कांद्यापासून एकएक पाकळी वेगळी करून त्याची साल काढणं म्हणजे खूपच त्रासदायक. लसूण सोलण्यात वेळही जातो आणि कंटाळाही येतो. पण तुमचं हे काही तासांचं काम अवघ्या काही मिनिटांत होईल. एक साधा फुगा ढिगभर लसूण सोलून देईल. या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लसूण सोलण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. अगदी सहजसोप्या पद्धतीने लसूण सोलण्यासाठी प्रत्येक जण वेगळी ट्रिक वापरतो. पण तुम्ही कधी फुग्याचा वापर करुन लसूण सोलून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे असे कित्येक घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलण्याचा जुगाड.

आता फुग्याद्वारे लसूण कसा सोलायचा ते पाहुयात.

सर्वात आधी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्या, त्यानंतर मोठ्या आकाराचा फुगा घ्या, म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त लसूण बसेल. या फुग्याचा वरचा म्हणजेच निमुळता भाग कात्रीने कापून घ्या. कापलेला तुकडा टाकून देऊ नका. कापलेला फुगा उघडून घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या सगळ्या पाकळ्या टाका, त्यानंतर फुग्याचं उघडलेलं तोंड बंद करा. आणि मग त्याची मूठ बांधून तळव्याने त्याला जमीनीवर चोळा. ५ मिनिटं असं करा आणि सगळा लसूण बाहेर काढा, तुमचा विश्वास बसणार नाही असा लसूण सोललेला तुम्हाला दिसेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad : झोपण्याआधी बेडवर चहाची गाळणी फिरवा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)