ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या सर्वच कंपन्या विविध ऑफर्स जाहीर करत असल्याचे दिसते. आपले उत्पादन विकले जावे यासाठीच हा खटाटोप केलेला असतो. सणासुदीच्या काळात तर या ऑफर्सची लयलूटच होते. टाटा मोटर्सने नुकतीच एक ‘फेस्टिव्हल ऑफ गिफ्ट’ नावाची एक डिस्काउंट स्कीम लाँच केली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना एकाहून एक आकर्षक अशा भेटवस्तू देणार असल्याचे जाहीर केले आहे. हेक्सा, नेक्झॉन, सफारी स्टॉर्म, टियागो, झेस्ट, टिगॉर या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खास भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या ऑफर्समध्ये गाडीच्या किमतीवरही सूट दिली जाणार आहे. त्याबरोबरच तनिष्क व्हाऊचर्स, टॅबलेट, ३२ इंच एलईडी टिव्ही आणि अन्य भेटवस्तूही मिळतील. यामध्ये ग्राहकांना आयफोन एक्सही भेट दिला जाईल, मात्र तो कोणत्या गाडीवर मिळेल याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण तरीही तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल तर टाटा मोटर्स हा निश्चितच उत्तम पर्याय आहे.

जाणून घ्या कोणत्या कारवर किती रुपये सूट मिळेल…

man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

टिगॉर – ७३ हजार रुपये
नेक्झॉन – ५७ हजार रुपये
स्टॉर्म- ८७ हजार रुपये
हेक्सा – ९८ हजार रुपये
झेस्ट- ८३ हजार रुपये
टियागो- ४० हजार रुपये

ग्राहकांचा सण चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आम्ही सज्ज आहोत असे कंपनीचे सेल्स, मार्केटींग आणि कस्टमर सपोर्ट विभागाचे उपाध्यक्ष एस.एन. बर्मन म्हणाले. ग्राहकांची सेवा करण्यासाठी कंपनीला मिळालेली ही एक उत्तम संधी आहे असे आम्ही मानतो. ग्राहकांना यावर्षी जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आम्ही फेस्टीव्हल ऑफ गिफ्ट हे कॅम्पेन सुरु केले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत जे ग्राहक टाटाची कोणतीही कार खरेदी करतील त्यांना काही ना काही गिफ्ट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा कंपनीचा मानस आहे. ग्राहकांचे ब्रँडबरोबर संबंध आणखी दृढ व्हावेत यादृष्टीने हे कॅम्पेन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.