तुम्ही पुजेच्यावेळी किंवा पानाच्या दुकानात सुपारीचा वापर करताना पाहिलं असेल. पण तुम्हाला माहित आहे का की सुपारीची पाने केस आणि त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. होय, सुपारीच्या पानांपासून बनवलेले तेल केवळ केसांच्या समस्याच दूर करू शकत नाही तर त्वचेच्या समस्या देखील दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तर जाणून घेऊया सुपारीचे तेल घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत.

सुपारीचे तेल बनवायचे कसे ?

१)प्रथम, सुपारीची पाने चांगली कापून घ्या आणि पाने पूर्णपणे धुवा.

environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

२)आता एका पातेल्यात खोबरेल तेल टाकून गरम करा आणि तेल पुरेसे गरम झाल्यावर सुपारीची पाने सुकवून कढईत टाका.

३)सुपारीच्या पानांसोबत हिबिस्कसची पाने घाला आणि नंतर खोबरेल तेल लाल झाल्यावर गॅस बंद करा आणि गाळून घ्या.

४) त्यांनतर तेल थंड होवू द्या. थंड झाल्यावर घट्ट बाटलीत भरून नंतर वापरा.

सुपारीच्या तेलाचे फायदे

१) सुपारीचे तेल केसगळती थांबवण्यासोबतच केस मजबूत बनवते.

२) त्वचेवरील खाज आणि कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी हे तेल खूप उपयुक्त आहे.

३) जर तुम्हाला मुरुमांचा त्रास असेल तर सुपारीचे तेल तुमची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

४) सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी सुपारीच्या पानांचे तेलही खूप उपयुक्त ठरू शकते.

५) सुपारीच्या पानांचे तेल त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)

हे तेल केसगळती थांबवण्यासोबतच केस मजबूत बनवते.