scorecardresearch

Premium

Tips: केस पातळ होण्याची ‘ही’ आहेत तीन कारणं, कधीही करू नका अशा चुका

प्रत्येकाला आपले केस सुंदर, लांब आणि घनदाट असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण केस गळण्याची आणि पातळ होण्याच्या समस्येने अनेक लोकं खूप त्रस्त आहेत.

केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. (photo credit: file photo)
केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. (photo credit: file photo)

प्रत्येकाला आपले केस सुंदर, लांब आणि घनदाट असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण केस गळण्याची आणि पातळ होण्याच्या समस्येने अनेक लोकं खूप त्रस्त आहेत. तर कोणत्या चुकांमुळे केस गळत आहेत, तसेच पातळ होतात हे देखील काहींना कळत नाही. चला तर मग जाणून घेऊयात तुमचे केस कोणत्या चुकांमुळे पातळ होऊ लागतात.

या चुकांमुळे तुमचे केस होतात पातळ

हेअर प्रोडक्ट

केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. आजकाल स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात, ज्यामुळे केस खराब तर होतातच पण सोबतच गळण्याची समस्या उद्भवते. यामुळे केस पातळ होऊ लागतात.

Sankashti chaturthi 2024 how to make sabudana kheer
संकष्टी चतुर्थी विशेष साबुदाण्याची खीर; उपवासाच्या दिवशी बनवा ही खास गोड रेसिपी…
Reverse fatty liver easily What to eat, what not
मद्यपान न करताही यकृताला सूज येण्याचा धोका! डॉक्टर सांगतात, आहार कसा असावा? काय खावं, काय टाळावं?
nagpur, gold prices, gold price declined marathi news,
खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…
About what society says about a career in gaming How society views gaming
चौकट मोडताना: गेमिंगकडे समाज कसा बघतो?

शॅम्पूचा जास्त वापर करणे

जास्त शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात. शॅम्पूमध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे शॅम्पूचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केस पातळ तर होतातच पण गळूही लागतात.

व्हिटॅमिन डीची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने देखील केस अधिक गळतात आणि पातळ होतात. यासाठी महिलांनी सकाळी सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. तसेच सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, त्यामुळे केस पातळ तर होतातच पण गळूही लागतात. अन्नामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असताना देखील ही समस्या उद्भवू शकते. अनेकदा ते त्यांच्या वजनाबाबत खूप जागरूक असतात, त्यामुळे ते त्यांच्या आहारातून आवश्यक पोषक घटक काढून टाकतात, ज्याचा परिणाम केसांवर होतो आणि त्यामुळे केस पातळ होऊ शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thin hair problems solution chemical products shampoo vitamin d sun how to take care scsm

First published on: 23-03-2022 at 13:55 IST

संबंधित बातम्या

×