Parenting Advice: मुलांचे संगोपन हे मुलांचे आयुष्य घडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारते. मुलांना काय शिकवले जात आहे आणि त्यांच्याशी संवाद कसा साधला जात आहे, त्यांना काय करायला सांगितले जात आहे किंवा मुलांच्या चुकांवर आई-वडील कसे वागतात या सर्वाचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होत असतो. मुलांच्या बाबतीत विशेषत: या गोष्टी ऐकायला मिळतात की, त्यांचे चांगले-वाईट वर्तन त्यांच्या आईवडीलांची शिकवण असते. आई आणि लेकाच्या नात्याबाबत सांगायचे झाले तर त्यांचे नाते अत्यंत खास असते. नेहमी अस म्हणतात की मुलं आईचे लाडके असतात अशा स्थितीमध्ये आईचे संस्कार, आईचे ओरडणे आणि प्रेम करणे सर्व गोष्टींच्या मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. कित्येकदा आई मुलांना अशा गोष्टी ऐकवते किंवा अशा गोष्टींवरून मुलांना ओरडते ज्याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर होतो. आईचे शब्द मुलांच्या मनाला दुखावू शकतात म्हणूनच मुलांचे संगोपन करताना या गोष्टी टाळा.
आईने लेकाला कधीही ऐकवू नयेत या गोष्टी
मुलं कधीही रडत नाही
मुलांना लहानपणापासून शिकवले जाते की, त्यांचे रडणे ही त्यांची कमतरता आहे. मुलांच्या भावना नेहमी हे सांगून दाबल्या जातात. जेव्हा आई देखील मुलाला हे मुलं कधीही रडत नाही असे म्हणते तेव्हा ते शब्द मुलांच्या मानाला लागतात आणि त्यांना असे वाटते की त्यांना कोणीही समजू शकत नाही.
तु आपल्या बहिण किंवा भावासारखा का नाहीये?
मुलांची एकमेकांशी तुलना केल्याचे अनेकदा पाहायला मिळते. मुलगा जर अभ्यासमध्ये मागे असेल आणि कोणतेही काम करत नसेल तर त्याची तुलना बहिण-भावासह केली जाते. तु तुझ्या बहिण किंवा भावासारखा का नाहीस? असे ऐकवले जाते. त्यामुळे मुलांची अशी तुलना केल्याने मुलाचे मन दुखावले जाते.
हेही वाचा – तुमच्या जोडीदाराला खूप राग येतो का? रिलेशनशिप एक्सपर्टने सांगितले रागवणारा जोडीदार असण्याचे फायदे
घरात बसून खातो
मुलगा जर कॉलेजला जाणारा असेल, कॉलेज संपवून एखाद्या परिक्षेची तयारी करत असेल किंवा काही वेळ विचार करण्यासाठी घालवत आहे त्याला अशावेळी टोमणे मारले जाता. कारण मुलांकडून घर चालवणे जाण्याची अपेक्षा केली जाते आणि त्यांना नेहमी प्रगती केली पाहिजे, थांबले नाही पाहिजे असे सांगितले जाते. भलेही मुलगा दाखवत नसेल पण त्याच्या मनाला ही गोष्ट लागते.
हेही वाचा – गप्प बसा! दिवसभरात फक्त १ तास शांत राहा, कोणाशीच काही बोलू नका; सुधारू शकते तुमचे मानसिक आरोग्य
चूक तुझीच असेल
नेहमी असे गृहित धरले जाते की चूक मुलाची असते. मग भलेही त्याचे भांडण बहिणीसह झाले असे किंवा आपल्या मित्रांसह…कोणत्याही तथ्याशिवाय त्याच्यावर आरोप करणे किंवा विश्वास न दाखवणे त्याला दुखावू शकते. भलेही भांडण बहिणीशी होऊ दे किंवा आपल्या मित्रासह, मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर निर्णय घ्या.