scorecardresearch

सकाळी उठताना करा ‘या’ क्रिया, लवकर जाग येईल, दिवसही चांगला जाऊ शकतो

रात्री चांगली झोप झाल्यास दिवसा लवकर जाग येते आणि उर्जावान असल्यासारखे वाटते. मात्र झोप न झाल्यास ताजेतवाने वाटत नाही. या पार्श्वभूमीवर काही क्रिया जाणून घेऊया ज्या तुम्ही सकाळी उठून केल्यास तुमची दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते.

सकाळी उठताना करा ‘या’ क्रिया, लवकर जाग येईल, दिवसही चांगला जाऊ शकतो
प्रतिकात्मक छायाचित्र (pic credit – pexels)

कामाचे ताण आणि वाईट सवयी हे दोन्ही शरीराला नुकसान करणाऱ्या अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य आहार, व्यायाम आणि आनंद असणे गरजेचे आहे. या दोन गोष्टींनी शरीराला काम करण्यासाठी उर्जा मिळू शकते. तसेच, झोप देखील महत्वाची आहे.
रात्री चांगली झोप झाल्यास दिवसा लवकर जाग येते आणि उर्जावान असल्यासारखे वाटते. मात्र, झोप न झाल्यास ताजेतवाने वाटत नाही. या पार्श्वभूमीवर काही क्रिया जाणून घेऊया ज्याद्वारे तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. तसेच तुमचा दिवसही चांगला जाऊ शकतो.

१) हात तळवे एकमेकांना घासणे

सकाळी उठण्यापूर्वी दोन्ही हातांचे तळवे एमेकांना घासा. याने लवकर जाग येते. सकाळी उठण्याअगोदर ही प्रक्रिया करून नंतर दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. शरीर जागण्यापूर्वी इंद्रिये आणि मेंदू जागृत करणे गरजेचे आहे, असे मानले जाते. ही क्रिया केल्यास दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते.

(मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय, फरक दिसून येईल)

२) सकाळी हसत हसत उठणे

सकाळी उठताना हसत हसत उठा. लोकांसोबत चांगले वागा. कुणासोबत भांडू नये. तुमच्या आयुष्यात जी लोक महत्वाची आहेत त्यांच्याशी बोला. असे केल्यास तुम्हाला बरे वाटेल. हसल्याने आरोग्य देखील चांगले राहाते. हसत हसत उठल्यास तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो.

३) चेहऱ्यावर पाणी मारा

सकाळी उठल्यावर तोंडावर पाणी मारले पाहिजे. विशेषकरून डोळ्यावर पाणी शिंपडणे हा आयुर्वेदात चांगला व्यायाम मानला जातो. केवळ एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी अधिक थंड आणि अधिक गरम घेऊ नका. पानीचे तापमान रूम टेम्परेचरनुसार असावे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या