बेबी ऑइल हे केवळ लहानांसाठीच नाही तर बऱ्याच महिला देखील त्याचा वापर करतात. अनेकजणी बेबी ऑइलचा मेकअप रिमूव्हर म्हणून वापर करतात. तर काहीजणी रात्री मॉइश्चकारायझर म्हणून चेहऱ्यावर बेबी ऑइल वापरतात. बेबी ऑइल वापरण्याचे फायदे ज्याप्रकारे आहेत त्याप्रकारे त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. हे दुष्परिणाम कोणते जाणून घेऊ.
बेबी ऑइलमध्ये मिनरल ऑइल, खोबरेल तेल, व्हिटॅमिन ए, ई, जोजोबा ऑइल, कोरफड आणि मध यासारखे नैसर्गिक घटक असतात. जे त्वचेवरील मॉइश्चर लॉक करून त्वचा मऊ आणि मखमली बनवतात. बेबी ऑइलच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. पण काही वेळी बेबी ऑइल वापरामुळे त्वचेच्या अनेक समस्याही जाणवतात.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांना बेबी ऑइलच्या वापरामुळे विविध समस्या जाणवू शकतात. ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट आहे त्यांनी बेबी ऑइलचा वापर कमी करावा. विशेषत: उन्हाळ्यात बेबी ऑइलचा वापर न करणेच उत्तम. कारण यामुळे तुमचा चेहरा अधिक चिकट दिसू शकतो. उन्हाळ्यात बेबी ऑइलचा वापर करत असाल तर ते लावल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करायचा विसरु नका. यानंत गरम टॉवेलने वाफ घ्या, असे केल्याने तुमची त्वचा तेलटक दिसणार नाही.
मुरुमांची समस्या
सर्वच लोकांच्या त्वचेवरील छिद्र लॉक नसतात. यामुळे ज्या लोकांची त्वचा खूप तेलकट असते किंवा ज्यांना मुरुमांची समस्या असते त्यांच्यासाठी बेबी ऑइलचा वापर हानिकारक ठरु शकतो. कारण बेबी ऑइलमधील मिनिरल ऑइल तुमच्या त्वचेवरील छिद्र लॉक होतात. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते.
त्वचेची एॅलर्जी
संवेदनशील त्वचेवर बेबी ऑइल लावल्याने एॅलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर पुरळ उठण्यासह लालसरपणा किंवा खाज सुटू शकते. म्हणून संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना बेबी ऑइल लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
सनबर्नचा धोका
बेबी ऑइलमुळे सनबर्नचा धोका वाढतो. कारण असे मानले जाते की, हे तेल अतिनील किरणांना आकर्षित करते. त्यामुळे पेशी खराब होण्याची शक्यता वाढते. अनेक संशोधकांचा असाही दावा आहे की, बेबी ऑइलच्या वापरामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यताही वाढते. यावर अद्याप संशोधन सुरु आहे, पण सुरक्षित राहणयासाठी उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी त्वचेवर बेबी ऑइल न लावणेच शहाणपणाचे आहे.
अशाप्रकारे बेबी ऑइलचा वापर करा
सर्वप्रथम लक्षात ठेवा की, बेबी ऑइलचा वापर सकाळी नाही तर रात्री करावा. तसेच बेबी ऑइल लावून घराबाहेर पडू नका. रात्री त्वचा रिपेयरिंग मोडमध्ये असते. यावेळी बेबी ऑइल लावल्याने त्वचेला अतिरिक्त पोषण मिळते. बेबी ऑइल लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने व्यवस्थित धुवून घ्या. जेणेकरुन तुमच्या चेहऱ्यावरील दिवसभर साचलेली धूळ आणि घाण निघून जाईल, यानंतर टॉवेलने चेहरा पुसून घ्या आणि नंतर चेहऱ्यावर बेबी ऑइल लावा. चेहऱ्यावर बेबी ऑइल लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चेहरा धुवा.
(ही बातमी उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)