कमळाच्या फुलांचे हे लटकन गणपतीच्या मखरासाठी पार्श्वभूमी म्हणून वापरा. ते कसे बनवता येईल हे पुढे वाचा.
वयोगट – 15 वर्ष आणि पुढे
उत्पादन – फेविक्रिल अक्रेलिक रंग निऑन पिंक 018, फेविक्रिल अक्रेलिक कलर्स पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फेविक्रिल फॅब्रिक ग्लू, फाइन आर्ट ब्रशेस
साहित्य – माउंट बोर्ड, पांढरा कागद, पिवळा कार्बन कागद, पेन्सिल, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे, पेपर कटर, कात्री, जाड सोनेरी धागा, प्लॅस्टिकचे मणी (गुलाबी, मेटॅलिक निळा)
पद्धत:
पायरी 1 – कमळाचे कटआउट्स बनवा.
- गणेशोत्सवासाठी आपण कमळाच्या फुलांची सजावट बनवणार आहोत.
- ए फोर आकाराचा पांढरा कगद घ्या व त्यावर कमळाच्या फुलाचे चित्र कट वर्क पेटल डिझाइनसह काढाय
- कमळाचे फुल आउटलाइनवरून पेपर कटरच्या सहाय्याने कापून घ्या.
- सजावटीसाठी 6 मोठी, 3 मध्यम आणि 3 लहान फुले बनवा.
पायरी 2 – आतील भाग कापून घ्या
- कमळाच्या फुलाचा आतील भाग पेपर कटरने कापा.
- चित्राचा संदर्भ घ्या
पायरी 3 – पार्श्वभूमी कापून व रंगवून घ्या.
- माउंट बोर्ड घ्या.
- तीन वेगवेगळ्या आकारांत कमळाची एकसारखी आउटलाइन बनवा.
- अक्रेलिक रंग निऑन पिंक 018 ने कमळफुले रंगवा.
- सुकण्यासाठी ठेवा.
पायरी 4 – फुलांची जुळणी
- कमळ फुलांचे कटवर्क घेऊन ते अक्रेलिक रंग पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवाय
- सर्व फुले एकाच रंगछटेत रंगवाय
- मागील बाजूच्या कर्टवर्क फुलावर गुलाबी पिंक कट आउट्स फॅब्रिक ग्लुने चिकटवा.
- सुकण्यासाठी ठेवा.
पायरी 5 – फुलांचे लटकन तयार करणे
- जाड सोनेरी धागा, मेटॅलिक ब्लू प्लॅस्टिक बीड्स घेऊन मण्यांची माळ बनवा.
- कमळ फुलांच्या दोन्ही टोकांना भोक पाडून त्यावर मण्यांची माळ जोडा.
- पर्यावरणस्नेही कमळ फुलांची सजावट गणेशोत्सवासाठी तयार आहे.
(भावना मिश्रा, फेविक्रिल तज्ज्ञ)