फ्रिज हा मानवी जीवन अधिक सुलभ आणि सोपे करणारा एक अविष्कार आहे. कित्येक पदार्थ खराब होऊ नये आणि जास्तीत जास्त काळ ताजे राहावे म्हणून आपण फ्रिजमध्ये साठतो. भाज्यांपासून दुधापर्यंत सर्वकाही आपण फ्रिजमध्ये ठेवतो जेणेकरुन त्याची दिर्घकाळ खाण्यायोग्य आणि सुरक्षित राहतील. आपण कित्येकदा चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवतो जेणेकरून सकाळी घाई गडबडीमध्ये नाश्ता किंवा जेवन तयार करताना वेळ वाचेल. पण फ्रिजमध्ये कधीही चिरलेला कांदा ठेवू नये असा सल्ला दिला जातो.
कांदा फ्रिजमध्ये ठेवणे का टाळावे?
काद्यांला एक प्रकारचा वास असतो आणि त्यामध्ये सल्फर असते ज्यामुळे कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येते. चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. हवेमध्ये हे रोगकारक जीवाणू असतात ज्याच्या संपर्कात आल्यांतर कांद्यावर ऑक्सिडेशन प्रक्रिया सुरू होते आणि कांदा खराब होऊ शकतो. (ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे अशी अभिक्रिया ज्यामध्ये एकतर ऑक्सिजन जोडला जातो किंवा हायड्रोजन काढून टाकला जातो) असा खराब झालेल्या कांद्याचे सेवन केल्यास पोटाशी संबधीत समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्ही आजारी पडू शकता. फक्त एवढचं नाही तर दिर्घकाळ कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास कांद्यामध्ये असलेले पोषणमुल्य देखील कमी होते. कांदा चिरल्यानंतर त्याचा रस तुमच्या हातांना लागतो, तो जेव्हा हवेच्या संपर्कात येतो, ज्यामुळे काद्यांमध्ये जीवाणूंची वाढ होते. त्यामुळेच कादां चिरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवू नये असे सांगितले जाते.
हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?
चिरलेला कांदा फ्रिजमध्ये साठवण्यासाठी काही टिप्स
- चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवता येऊ शकतो पण त्याची एक योग्य पद्धत आहे ज्याचे पालन आपण केले पाहिजे.
- चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवताना एखादा डब्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून तो दिर्घकाळ ताजा राहील.
- चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवताना एखादा प्लास्टिक पिशवी ठेवू शकता त्यामुळे कांदा खराब होणार नाही.
- जर तुम्हाला आधीच जास्तीचा कांदा कापून ठेवायचा असेल तर तो हवा बंद डब्यात ठेवा. उघड्या झाकणाच्या डब्यात कांदा ठेवणे टाळा.
- जर व्यस्त जीवनशैलीमध्ये तुम्ही वेळ वाचवण्यासाठी रात्री कांदा चिरून ठेवत असाल तर तुम्ही तो काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता आणि मग ते फ्रिजमध्ये ठेवू शकता.
- कांदा कधीही उघड्या भांड्यामध्ये ठेवू नये. तुम्ही व्यवस्थित झाकण लावून ते ठेवाल याची खात्री करा.