हल्ली स्मार्टफोन आल्यामुळे किंवा त्याच्यामुळे अनेक कामे होत असल्याने लहान मुलांची वाचनाची आवड कमी झाली आहे. ही गोष्ट काही नवीन नाही. हल्ली सर्व गोष्टी मोबाइलवर होत आहेत. अनेक लहान मुलांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. त्यांना फक्त खेळायचं असते. मात्र यामध्ये मुलांचा काही दोष नाहि. बाहेर जर का त्यांचे मित्र खेळात असतील किंवा अजून काही करत असतील त्यांनाही त्याच्यासह खेळाची इच्छा होतेच. मुलांची अभ्यास न करण्याची सवय पालकांच्या चिंतेचे कारण बनते.

मुलांनी जर का अभ्यास नाही केला तर त्यांना शाळेत शिकवत असलेला अभ्यास त्यांना समजण्यास अडचण होईल आणि ज्या गतीने त्यांनी शिके पाहिजे ती गती कमी होईल अशी चिंता पालकांना सतावत असते. मात्र मुलांचा अभ्यासात रस नसण्याची अनेक करणे असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये पालक म्हणून आपण मुलाला अभ्यासासाठी कसे प्रोत्साहित करू शकतो आणि कशामुळे त्यांना अभ्यासाची आवड लागू शकते याबद्दल काही सोप्या गोष्टी जाणून घेणार आहोत. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.

हेही वाचा : लहान मुलांना दिलेला स्मार्टफोन, मोठेपणी त्यांच्यासाठी मानसिक आजार ठरतो; नव्या संशोधनातून सावधानतेचा इशारा

मुलांच्या शेजारी बसून टेन्शन वाढवू नये

जेव्हा तुमचा मुलगा अभ्यास करत असेल तेव्हा तुम्ही त्याच्या शेजारी बसू शकता. असे सांगण्याचा उद्देश असा की असे शेजारी कोणी बसल्यास त्याला अभ्यासाची आवड लागू शकते किंवा त्याला त्याचा कंटाळा येणार नाही. मात्र मुलाला पाक शेजारी बसल्याची भीती वाटत असे किंवा पालक त्याला ओरडत असतील तर मुलाला अभ्यास करणे अवघड वाटू शकते. अभ्यासात त्याचे लक्ष पूर्णपणे विचलित होऊ शकते.

अभ्यासाची वेळ निश्चित करावी

मुलांना सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा असा अभ्यास करण्याची सवय असते. त्याचे जे वेळापत्रक असेल त्यानुसार मुलाचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलाच्या खेळण्याचे देखील एक वेळापत्रक तयार करावे. त्यावेळेत त्याला अभ्यास करायला लावू नये.

अभ्यासात आनंद वाटणे आवश्यक

नवनवीन गोष्टींचा अभ्यास करून त्याला अनेक गोष्टी कशा शिकता येतील याबद्दल पालकांनी आपल्या मुलाला सांगणे फायदेशीर ठरते. त्याला मार्कांचे टेन्शन घेऊ देऊ नका तसेच पालकांनी देखील तयाचयावर मार्कांचे टेन्शन देऊ नये. अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी तुम्ही त्याला त्यासंबंधित व्हिडीओ पण दाखवू शकता.

हेही वाचा : वर्कआऊट करण्याआधी व नंतर ‘हा’ नियम नेटाने पाळा, शरीराला मिळतील ६ मोठे फायदे

दुर्लक्ष करणाऱ्या गोष्टी लांब ठेवाव्यात

तुमची मुलं कोणत्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी कोणता आवाज होणार नाही किंवा त्याचे लक्ष अभ्यासातून विचलित होईल असे काही होणार नाही त्याची काळजी घ्यावी. कारण एकदा जर का मुलांचे लक्ष विचलित झाले तर त्यांना अभ्यासात मन एकाग्र करणे कठीण होते. जाते वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवता येईल करावा.

लहान-लहान ब्रेक द्यावेत.

तुमची मुलं २ तास सलग अभ्यास करत असतील तर तुम्ही मुलांना सलग २ तास अभ्यास करायला देऊन नका. त्याऐवजी मध्येच त्याला थोडासा ब्रेक द्यावा. त्याला एखादे फळ किंवा ज्यूस खायला द्या. जेणेकरून ब्रेकनंतर त्याचे लस्कह पुन्हा अभ्यासात एकाग्र होइल. तसेच थोडेसे खाल्ल्यामुळे त्याला तहान किंवा भूक देखील लागणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)