scorecardresearch

Premium

संत्र्याची साल कचऱ्यात टाकून देण्याची चूक करू नका? किचनपासून गार्डनपर्यंत ‘असा’ करू शकता त्याचा वापर

Effective tips to use waste Orange peel संत्र्याची सालीचा वापर त्वचेती काळजी घेण्यासाठी, साफसफाई आणि स्वयंपाक घरापासून गार्डनपर्यंत केली जाऊ शकते.

Effective tips to use waste Orange peel
कसा कराव संत्र्याच्या सालीचा वापर (फोटो सौजन्य – फ्रिपीक)

Effective tips to use waste Orange peel : आंबट-गोड संत्री खायला अनेकांना आवडते. संत्री खायला चविष्ट असतात पण त्यामध्ये अनेक पोषक तत्व आणि आरोग्यासाठी फायदे देखील समाविष्ट असतात. पण कित्येक चांगल्या गुणांनी भरपूर संत्र्याची साल तुम्ही फेकून देता का? बहुतेक लोक संतरी खाऊ त्याचे साल कचऱ्यामध्ये टाकून देतात पण तुम्ही असे करू नका. संत्र्याची सालीचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी, साफसफाई आणि स्वयंपाक घरापासून गार्डनपर्यंत केली जाऊ शकते. काही सोपे पर्याय वापरून तुम्ही संत्र्याच्या निरुपयोगी समजणाऱ्या सालीचा वापर करू शकता.

संत्र्याची साल कशी वापरावी?

Want to go to Ayodhya from Pune signs of waiting for direct trains
पुण्याहून अयोध्येला जायचंय? थेट रेल्वेसाठी वाट पाहावी लागण्याची चिन्हे
Perfect Time To Eat Dinner
रात्री १०- ११ वाजता झोपत असाल तर जेवणाची योग्य वेळ कोणती? आहारतज्ज्ञांनी सोडवलं कोडं, जाणून घ्या पचनाचा फंडा
Union Budget 2024 no tax on salary up to 8 lakhs
८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!
RPF Recruitment 2024
RPF अंतर्गत लवकरच २००० पदांची मेगाभरती! १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा कुठे आणि कसा करायचा अर्ज


संत्र्याच्या सालीपासून फेस पॅक तयार करा – संत्र्याच्या सालीपासून फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागत नाही, संत्र्याची साल उन्हात नीट वाळवा, बारीक करून त्यात मध किंवा गुलाबपाणी घालून चेहऱ्याला लावा. फेस पॅक प्रमाणे चेहऱ्यावर लावा. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्याचा हा एक नैसर्गिक आणि आर्थिक मार्ग आहे.

हेही वाचा – आलिंगन किंवा मिठी मारणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

जास्त काळ साखर साठवून ठेवण्यास उपयुक्त – संत्र्याच्या सालीचा वापर जास्त काळ साखर साठवण्यासाठी केला जाऊ शकतो. बेकिंगसाठी वापरला जाणारा ब्राऊन शुगरचा पॅक उघडल्यानंतर काही वेळातच खराब होऊ लागतो आणि त्यात गुठळ्या तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही या साखरेच्या पाकीटात २ ते ४ संत्र्याची साले टाकू शकता, असे केल्याने साखर निरोगी राहते.

बागेत संत्र्याची साले वापरा – बागेत संत्र्याची साल अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. संत्र्याची साले सुकवून त्याची बारीक पेस्ट तयार करून ती खतामध्ये मिसळून झाडांची वाढ वाढते. जर तुम्हाला तुमच्या बागेचे कीटकांपासून संरक्षण करायचे असेल तर संत्र्याची साले खूप फायदेशीर आहेत. संत्र्याची साले लहान तुकडे करून झाडाभोवती टाका. यामुळे कीटक दूर राहतात.

हेही वाचा – Winter Special : स्वेटर, कानटोपी, मफलर…लोकरीच्या कपड्यांचा विचित्र वास येतोय? मग सोप्या टिप्स वापरा, न धुता गायब होईल दुर्गंध

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यात प्रभावी – संत्र्याची साले किचन स्वच्छ करण्यासाठी आणि किचनमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. स्वयंपाकघरातील सिंकमध्ये शिळे अन्न अडकल्याने दुर्गंधी निर्माण होते, अशा वेळी संत्र्याच्या सालीने घासल्याने वास निघून जातो. स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी संत्र्याची साले पाण्यात टाका, थोडा वेळ उकळा आणि या पाण्याने स्वच्छ करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tips and tricks easy tips to use waste orange peel effectively snk

First published on: 23-11-2023 at 22:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×