How to clean Toilet: बर्‍याच वेळा आपण कॉफी प्यायल्यानंतर उरलेला कॉफीचा चोथा (कॉफी उकळल्यानंतर जी कॉफीची पावडर उरते) निरुपयोगी समजून कचऱ्यात टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हाच कॉफीचा चोथा तुमचा बाथरूम चमकवायला आणि सुगंधी ठेवायला खूप सोपा आणि स्वस्त उपाय ठरू शकतो? होय, स्वयंपाकघरात उरलेली ही साधी गोष्ट जर तुम्ही टॉयलेट साफ करण्यासाठी वापरलात, तर तुमचा बाथरूम काही मिनिटांतच एकदम ताजा आणि स्वच्छ दिसेल.

कॉफीचा वापर (Toilet Clean with Coffee)

कॉफी पावडरचा चोथा थोडा दाणेदार असतो, त्यामुळे तो नैसर्गिक स्क्रबरसारखं काम करतं. टॉयलेट साफ करताना आपण नेहमी केमिकल्स आणि ब्लीचचे प्रॉडक्ट्स वापरतो, पण कॉफीचा चोथा कोणत्याही घातक पदार्थाशिवाय छान साफसफाई करतो. फक्त टॉयलेट बाउलमध्ये एक चमचा कॉफीचा चोथा टाका आणि ब्रशने घासा. हलके डाग आणि जमीलेली घाण सहज निघते.

कॉफीमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि जंतूनाशक गुण फक्त साफसफाईत मदत करत नाहीत तर टॉयलेटमधली दुर्गंधीही घालवतात. बाथरूममध्ये केमिकल क्लिनरमुळे जास्त तीव्र वास येतो, पण कॉफीचा हलका सुगंध बाथरूमला ताजेतवाने वाटायला लावतो. म्हणूनच आजकाल बरेच लोक घर साफ करण्यासाठी हा सोपा उपाय वापरू लागले आहेत.

याशिवाय कॉफीच्या चोथ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तो पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. बाजारात मिळणारे टॉयलेट क्लिनर पाण्याबरोबर गटारात जातात आणि हळूहळू पर्यावरणाला हानी पोहोचवतात. पण कॉफीचा चोथा पूर्णपणे जैवविघटनशील आहे, म्हणजे त्याचा वापर केल्याने कुठलाही प्रदूषण होत नाही.

कसा कराल कॉफीचा वापर

आणखी एक छान उपाय असा आहे की, जर तुम्ही कुठे फिरायला किंवा काही दिवसांसाठी घराबाहेर जात असाल, तर टॉयलेटमध्ये जाताना एक चमचा कॉफीचा चोथा टाकून जा. घर अनेक दिवस बंद राहिलं की बाथरूममध्ये वास येणं सामान्य आहे. पण कॉफीचा चोथा तो वास थांबवून जागा ताजी ठेवतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही परत याल, तेव्हा बाथरूम अगदी आत्ता साफ केल्यासारखं ताजं वाटेल.

कॉफीचा चोथा वापरण्याचा हा उपाय फक्त सोपा नाही तर पैशांचीही बचत करतो. महागडे आणि जास्त केमिकल असलेले क्लिनर घेण्याची गरज नाही. फक्त वापरलेला कॉफीचा चोथा फेकून न देता एका डब्यात जमा करा आणि गरज पडल्यावर साफसफाईत वापरा. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही कॉफी प्याल, तेव्हा उरलेला पावडर टाकून न देता टॉयलेट साफ करण्यासाठी वापरून बघा. हा उपाय तुमचा बाथरूम चमकदार आणि वासमुक्त करेल आणि तुम्हाला ५-स्टार हॉटेलसारखा ताजेपणाचा अनुभव देईल.