सोशल मीडियातील दोन दिग्गज कंपन्या फेसबुक आणि ट्विटर यांच्यातील स्पर्धा अद्यापही कायम असल्याचं दिसतंय. नुकताच फेसबुकने आपला नवा ‘लोगो’ लाँच केला आहे. हा ‘लोगो’ वेगवेगळ्या रंगात असून हे रंग फेसबुकच्या इतर प्रोडक्टला दर्शवतात. फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये वेगळेपण रहावे, यासाठी हा ‘लोगो’ लाँच करण्यात आलाय. पण, हा ‘लोगो’ काही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला नाही. परिणामी लाँच झाल्यापासूनच काही नेटकऱ्यांकडून या लोगोची खिल्ली उडवली जात आहे. फेसबुकच्या नव्या लोगोची खिल्ली उडवण्यात ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी देखील मागे नाहीत. त्यांनीही आपल्या स्पर्धक कंपनीवर निशाणा साधण्याची ही संधी सोडलेली नाही.
जॅक डॉर्सी यांनी एक ट्विट करुन फेसबुकच्या नव्या लोगोची खिल्ली उडवली आहे. या ट्विटमध्ये केवळ तीन शब्द लिहिलेत. ‘Twitter from TWITTER’ या तीन शब्दांमध्येच डॉर्सी यांनी ट्विट केलंय. हे ट्विट प्रथमदर्शनी फेसबुकच्या नव्या कॅपिटल अक्षरांच्या लोगोची खिल्ली उडवणारं वाटतंय. पण, यासोबतच डॉर्सी यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर दिसणाऱ्या ‘from Facebook’या नावाचीही टर उडवलीये. फेसबुकने नवा लोगो लाँच करतेवेळी, वेगळेपण राहावं यासाठी फेसबुकशिवाय इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपसारख्या कंपनीच्या इतर सेवांमध्ये ‘from Facebook’ हे नाव दिसेल असं स्पष्ट केलं होतं. डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये याचीही खिल्ली उडवली आहे.
from
— jack (@jack) November 5, 2019
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, फेसबुकच्या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्रजी अक्षरं ही कॅपिटल लिपीमध्ये आहेत. कंपनीने हा लोगो एका खास उद्देशाने तयार केला आहे. हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून हे रंग इंस्टाग्राम किंवा व्हॉट्स अॅपसारख्या फेसबुकचे इतर प्रोडक्ट दर्शवतात. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे. हा नवीन लोगो फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये वेगळेपण रहावे, यासाठी लाँच करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे.