scorecardresearch

‘टाइप ३’ मधुमेहाचा मेंदूच्या आरोग्याशी थेट संबंध? वाढू शकतो मानसिक आजारांचा धोका

रुग्णाला केवळ शारीरिक त्रास होत नाही तर त्याला मानसिक समस्यांनाही सामोरे जाऊ लागू शकते.

‘टाइप ३’ मधुमेहाचा मेंदूच्या आरोग्याशी थेट संबंध? वाढू शकतो मानसिक आजारांचा धोका

मधुमेह हा वयानुरूप येणारा आजार आहे. जसे माणसांचे सांधे थकतात, धावण्याची, काम करण्याची ताकद कमी होते, तशाच इंसुलिन बनवणाऱ्या बीटा पेशींची क्षमतादेखील मंदावत जाते. आपण आपल्या वागण्याने बीटा पेशींना वेळेआधीच म्हातारं करतो आणि मधुमेहाला निमंत्रण देतो. वय कमी करणं कुणाच्याच हातात नाही. त्यामुळं मधुमेह पूर्ण बरा होण्याची शक्यता निदान नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही.

टाइप १ मधुमेहामध्ये रुग्णाच्या शरीरात इन्स्युलिन अतिशय कमी मात्रेत तयार होते किंवा होतच नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. टाइप २ डायबिटीज शरीरात इंसुलिन रेजिस्टेंस तयार होतात. मात्र, असे असूनही आपले शरीर याचा वापर करू शकत नाही. हे माधुमहचे दोन मुख्य टाइप आहेत. तथापि, अनेकदा टाइप ३चाही उल्लेख केला जातो. या टाइपला मधुमेहाचा सर्वांत घातक प्रकार म्हटले जाते. यामध्ये रुग्णाला केवळ शारीरिक त्रास होत नाही तर त्याला मानसिक समस्यांनाही सामोरे जाऊ लागू शकते. आज आपण मधुमेहाच्या या धोकादायक टाइपबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

टाइप ३ मधुमेह म्हणजे काय?

एका मेडिकल रिपोर्टनुसार, काही लोक अल्झायमर रोगांसाठी ‘टाइप ३ मधुमेह’ हा शब्द वापरतात. मात्र बहुतेक आरोग्य संस्था हा शब्द स्वीकारत नाहीत. काही वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की इंसुलिन रेजिस्टेंस हे मेंदूतील इंसुलिनच्या रेजिस्टेंसमुळे मेंदूमध्ये अमायलोइड प्लेक्स, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव होतो.डॉक्टरांनीही या आजाराला ‘टाइप ३ मधुमेह’ म्हणून स्वीकारलेले नाही. त्यांच्यानुसार, या आजाराला अल्झायमर रोगांच्या श्रेणीमध्ये ठेवले जावे. सामान्यतः या आजारादरम्यान रुग्णांच्या स्मरणशक्तीवर मोठा परिणाम होतो. यामुळे रुग्णालय अनेक मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. या आजारचे लक्षणे अतिशय सामान्य असतात. मात्र वेळेत यावर उपचार न झाल्यास ते गंभीर रूप धारण करू शकतात.

टाइप ३ मधुमेहाची लक्षणे :

  • स्मरणशक्तीवर गंभीररित्या परिणाम होणे.
  • योजना बनवण्यात आणि लिखाण काम करण्यात व्यत्यय येणे.
  • घरातील सामान्य कामकाज पूर्ण करण्यात अडचणी येणे.
  • एखाद्याला भेटण्याची जागा वारंवार विसरणे.
  • विशिष्ट गोष्टीवर आपले मत बनवू न शकणे.
  • सामाजिक आणि आर्थिक कार्यांप्रती अनास्था.
  • अचानक मूड बदलणे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजारपासून बचाव करणे शक्य आहे. टाइप ३ मधुमेहाच्या प्रतिबंधात अन्न आणि पेय यांचा कोणताही संबंध नाही. शरीराचे वजन आणि शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवल्यास इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि प्री-मधुमेह टाळता येऊ शकतो. अल्झायमर रोग टाळण्यासाठी कोणत्याही धोरणाची प्रभावीता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेली नाही. मात्र, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Type 3 diabetes direct link to brain health there may be an increase in the number of mental illnesses pvp