उन्हाळ्यात चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग तयार ठेवणे सोपे नाही. असे असतानाही अनेक महिला आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून स्किन केअर रुटीन फॉलो करणे विसरत नाहीत. त्यातच, गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून चेहऱ्यावर काही थंड वस्तूंचा वापर करणे ही या स्किन केअर रुटीनमधील सर्वात पहिली स्टेप आहे. याचाच एक भाग म्हणून अनेक महिला चेहऱ्यावर बर्फ लावणे पसंत करतात. तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावण्याचे फायदे केवळ चेहरा थंड ठेवण्यापुरते मर्यादित नाहीत. अर्थात, उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे वापरणे हा एका अद्भुत अनुभवापेक्षा कमी नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्फ चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच शिवाय चेहरा टवटवीत दिसतो. परंतु, बर्‍याच लोकांना बर्फाच्या तुकड्यांचे खरे फायदे माहित नाहीत. उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावल्याने त्वचा आणि आरोग्याशी संबंधित अनेक अनोखे फायदे होतात. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे वापरण्याचे काय फायदे आहेत.

National Banana Day 2022 : राष्ट्रीय केळी दिनानिमित्त जाणून घेऊया केळ्यांविषयी काही रंजक तथ्ये

त्वचेच्या समस्या होतात दूर :

उन्हाळ्यात बर्फाच्या तुकड्यांच्या मदतीने तुम्ही त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता. यासाठी बर्फाचे क्यूब कापडात किंवा बर्फाच्या पॅकमध्ये ठेवा आणि गोलाकार फिरवत दहा मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरील मुरुम, मुरुमांचे टॅनिंग, सनबर्न आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावरील सुजेवर परिणामकारक :

उन्हाळ्यात अनेकदा चेहऱ्यावर सूज येणे, जळजळ होणे, खाज येणे, चिडचिड होणे असे प्रकार होतात. अशा परिस्थितीत तुम्ही आईस क्यूब्सने चेहऱ्याला मसाज करू शकता. याने तुमची चेहऱ्यावरील सूज तसेच इतर समस्यांपासून सुटका होईल.

प्राइमर म्हणून वापरा :

मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी महिला सहसा चेहऱ्यावर प्राइमर वापरतात. त्याच वेळी, बर्फाचा क्यूब तुमच्यासाठी प्राइमर म्हणून देखील काम करू शकतो. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे चोळल्याने तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो.

तुम्हालाही सतत जाणवतो थकवा? जाणून घ्या यामागील कारणे आणि थकवा घालवण्याचे उपाय

रक्ताभिसरण चांगले होईल :

गोलाकार पद्धतीने बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग राहण्यासोबतच खूप तरुण दिसू लागते.

डोळ्यांसाठी फायदेशीर :

अनेकदा उष्णतेमुळे डोळ्यांत वेदना, खाज सुटणे आणि जळजळ होते. अशा परिस्थितीत तुम्ही बर्फाच्या तुकड्यांनी डोळ्यांना मसाज देखील करू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांवरील थकवा दूर होईल आणि डोळे निरोगी राहतील.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use ice in this way to take care of your skin in summer there will be many benefits pvp
First published on: 20-04-2022 at 13:16 IST