How To Make Pure Ghee Video: गाईच्या दुधापासून बनलेल्या साजूक तुपाच्या सेवनाने अनेक मोठे आजार टळतात असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. तुम्हाला माहित आहे का अनेक पोषणतज्ज्ञ तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुपाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. अशावेळी शुद्ध तूप वापरणे हे खूप आवश्यक आहे. अनेक गृहिणींना घरीच तूप बनवण्याची इच्छा असते. अनेकदा हा प्लॅन फसतो आणि मग आठवडे- महिने साठवलेली दुधाची साय वाया जाते. आज आपण कमी दुधातही भरपूर तूप बनवण्यासाठी दुधाची साय कशी साठवायची हे पाहणार आहोत. या सहा टिप्स वापरून तुम्ही कमी खर्चात शुद्ध, रवाळ व भरपूर तूप बनवू शकता. चला तर पाहूया…

१) दुधाची साय साठवण्यासाठी स्टील, काच किंवा चिनी मातीच्या भांड्याचा वापर करू शकता. चुकूनही प्लॅस्टिकचा डब्बा वापरू नका. यामुळे बुरशीची वाढ होत नाही आणि दुर्गंधीही येत नाही.

२) साय साठवून ठेवताना फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे जरीही साय बर्फात रूपांतरित झाली तरी ती नंतर विरघळणार आहे. यामुळे साधारण महिनाभर साय ताजी राहू शकते.

३) साय साठवून ठेवलेला डब्बा कधीही उघडा ठेवू नका. यामुळे साय फ्रीजमधील हवेमुळे कोरडी पडत नाही शिवाय सायीचा गंध सुद्धा फ्रीजभर पसरत नाही.

४) साय साठवून ठेवलेल्या कालावधीत फ्रीज डीफ्रॉस्ट करू नका. पण अगदीच आवश्यक असल्यास सायीच्या डब्याची अन्य ठिकाणी सोय करून मगच फ्रीज डीफ्रॉस्ट करा.

५) साय साठवलेली असताना त्यात एक चमचा दही मिसळू शकता जेणेकरून विरजण चांगले लागते व साय लगेच खराब होत नाही.

६) साय कडवताना विड्याचे पान किंवा सुपारी/तुळशीचे पान घातल्यास आंबट वास निघून जातो. तसेच तुप सुद्धा छान रवाळ व शुद्ध होते. तुपातील चिकटपणा काही प्रमाणात कमी होतो.

घरी तूप कसे बनवायचे?

हे ही वाचा<< पोहे, डोसा, उपमा बनवताना असे वाढवा प्रोटीनचे प्रमाण; डायबिटीज, हायपरटेन्शनवर रामबाण उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक बोनस टीप म्हणजे तुम्हाला जर दुधाची मलाई अधिक जाड व घट्ट हवी असेल तर आपण दूध तापवताना गॅस मंद आचेवर ठेवून अधिक वेळ उकळून घ्या. म्हशीच्या दुधाला जाड मलाई असते पण यामुळे तुपाचा दर्प व पोत साजूक तुपापासून वेगळा येतो.