Nitin Gadkari Favourite mirchi cha Thecha : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाचे नेते आहे. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांपैकी एक असलेल्या गडकरींना राजकीय भुमिकेमध्ये आपण नेहमी पाहतो. त्यांची भाषण, बोलण्याची शैली आणि हसतमुख चेहरा यामुळे नेहमीच जनतेला ते आपलेसे वाटतात. गडकरींचे जसे महाराष्ट्राच्या जनतेवर प्रेम तसेच महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांवर प्रेम आहे. गडकरी यांनी स्वत:च्या युट्युब चॅनलवर आणि काही मुलाखतींमध्ये त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी भाष्य केले आहे.

मुंबईतील शाहरुख खानच्या घराजवळील ताज हॉटेलमध्ये चायनीज, दिल्लीतील चाट गडकरी यांना आवडत असल्याचे त्यांनी काही मुलाखतींमध्ये सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आवडत्या पुण्यातील प्रभात हॉटेलच्या बटाटा वड्याची रेसिपी सांगितली होती. बटाटा वड्याप्रमाणेच आणखी एक महाराष्ट्रीय पदार्थ त्यांना आवडतो तो म्हणजे मिरचीच्या ठेचा. सध्या सोशल मीडियावर नितीन गडकरींनी सांगितलेल्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी चर्चेत आली आहे. चला तर मग गडकरींच्या आवडत्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी जाणून घेऊ या.

हेही वाचा – Video: नितीन गडकरींनी सांगितली पुण्यातील प्रसिद्ध वड्याची रेसिपी करा 

ठेचा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. पारंपारीक पद्धतीनुसार ठेचा तयार करण्याचा फक्त काही मिरच्या गरम तव्यात तेलावर चांगल्या भाजून घ्यायच्या, त्यात लसणाच्या चार-पाच कुड्या, मीठ टाकून एका तांब्याने तव्यातच रगडून घ्यायच्या. झणझणीत पणा कमी करण्यासाठी हवा असेल तर त्यात दाण्याचा कुटही टाकता येतो. पण गडकरी यांनी सांगितलेल्या ठेच्याची रेसिपी थोडी वेगळी आहे.

कर्ली टेल या युट्यूब चॅनला दिलेल्या मुखातीनुसार गडकरींच्या घरी ज्या पद्धतीने ठेचा बनवला जातो ती रेसिपी जाणून घेऊ या… . त्यासाठी कोथिंबीरी, मिरच्या, खोबर गरम तव्यामध्ये चांगले परतून घ्या. त्यात चिरलेला लसून टाकून परतून घ्या. त्यात थोडेसे मीठ, साखर आणि लिंबू टाकून सर्व खलबत्यामध्ये टाकून ठेचून घ्या. मिरचीचा ठेचा तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरींच्या आवडत्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी काही लोकांना आवडली तर काहींनी ठेच्यामध्ये साखर, खोबर, लिंबू नसते अशी तक्रार केली. तुम्हाला ही रेसिपी आवडते का ते स्वत: तयार करून पाहू शकता.