Suryanamaskar Video : सूर्यनमस्कार हा एक पारंपारिक योग सराव आहे. ज्यामध्ये १२ आसन समाविष्ट असतात. निरोगी आरोग्यासाठी दररोज न चुकता दिवसाची सुरूवात तुम्ही सूर्यनमस्काराने करू शकता. सूर्यनमस्कार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरात दिवसभर ऊर्जा मिळते. काही लोकांना शारीरिक समस्यांमुळे सूर्यनमस्कार उभे राहून करता येत नाही. असे लोक खूर्चीवर बसून सूर्यनमस्कार करू शकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सूर्यनमस्कार खूर्चीवर बसून कसा करावा, त्यासाठी तुम्हाला एक व्हिडीओ पाहावा लागेल. योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी खूर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसा करावा, याविषयी माहिती दिली आहे.

या व्हिडीओद्वारे योग अभ्यासक मृणालिनी सांगतात, “सू्र्यनमस्कार हा आपल्या शरीरासाठी एक सुंदर आणि परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे. पण बऱ्याच लोकांना सूर्यनमस्कार घालता येत नाही. कारण त्यांना उठताना बसताना त्रास होतो. गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास असतो तर काहींचं वय आणि वजन जास्त असल्याने हालचालींवर निर्बंध आलेले असतात. म्हणूनच आज आपण चेअर सूर्यनमस्कार कसे करायचे, हे शिकणार आहोत. म्हणजेच सूर्यनमस्काराची अशी पद्धत जी आपण खूर्चीवर बसून सुद्धा करू शकतो. जेणेकरून आपले शरीर छान सक्रिय राहीन. रक्ताभिसरण सुधारेल आणि छोट्या मोठ्या तक्रारी दूर होऊन छान फ्रेश एनर्जेटिक वाटेल. पुढे योगाभ्यासक मृणालिनी खूर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसा घालायचा, हे करून दाखवतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार हा एक सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम आहे ज्यामुळे हळूहळू शरीर लवचिक होते, संधिवात कमी होतो, आणि श्वासोच्छ्वास सुधारतो. वृद्ध व्यक्तींना किंवा योगाची नव्याने सुरुवात करणाऱ्यांना हा प्रकार विशेष लाभदायक आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मृणालिनी या योग शिक्षिका आहेत. त्या सोशल मीडियावर योगाविषयी आणि फिटनेसविषयी माहिती सांगतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकरी प्रतिसाद देतात.