How To Cover Grey Hair: आजपर्यंत आपण कांद्याच्या रसाने केस कसे दाट होतात तसेच केसाला कशी शाईन येते याचे अनेक व्हिडीओज पहिले असतील. मोठमोठ्या ब्युटी ब्रँड्सनी सुद्धा आपल्या उत्पादनांमध्ये कांद्याच्या रसाचा वापर करायला सुरुवात केली आहे. आयुर्वेदाचा हा भन्नाट उपाय आता सेलिब्रिटीज सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का केवळ कांद्याचा रस किंवा तेलच नव्हे तर कांद्याच्या ज्या साली आपण फेकून देतो त्यासुद्धा तुमच्या केसाचं रुपडं पालटण्यात कामी येऊ शकतात.

@sonakshisingh या ब्युटी इन्फ्ल्यूएंसरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कांद्याच्या सालीपासून बनवलेला हेअर मास्क शेअर केला ज्यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. आपणही या हेअरमास्कची स्टेप-बाय- स्टेप प्रक्रिया पाहुयात..

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
  • कांदा सोलून झाल्यावर त्याच्या सुक्या साली वेगळ्या करून ठेवा
  • एक तवा तापवून त्यात या साली काळपट होईपर्यंत भाजून घ्या
  • तुम्ही बघू शकता की जेव्हा साली काळ्या होतात तेव्हा त्यांना हात लावला तरी रंग हातावर उमटून दिसतो.
  • मग या कांद्याच्या साली मिक्सरमध्ये वाटून पावडर बनवून घ्या.
  • या पावडरमध्ये थोडं गुलाबजल किंवा तेल घालून तुमच्या पांढऱ्या केसांना लावा
  • थोड्यावेळाने केस धुवून घ्या.

अलीकडेच त्वचा तज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितले होते की, कांद्याचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. कांदयाच्या सालीशिवाय कांद्याचा रस केसांसाठी खूप आरोग्यदायी असू शकतो. याच्या मदतीने तुम्ही केस गळण्याची समस्या दूर करू शकता तसेच केसांची वाढ सुधारू शकता. कांद्यामध्ये असलेले सल्फर केस दाट करण्यासाठी प्रभावी आहे.

तुम्हालाही केसगळतीचा त्रास असेल तर कांद्याचे छोटे तुकडे करून खोबरेल तेलात टाका. हे तेल चांगले उकळून मंद आचेवर रंग तपकिरी होईपर्यंत शिजवा. तुम्हाला सहन होईल इतके तेलाचे तापमान झाल्यावर मग छान केसाला लावून मसाज करा.