Salt For Flower Plants Video: हौशीने आणलेली फुलझाडे जेव्हा कोमेजतात, सुकू लागतात, पिवळी पडू लागतात तेव्हा जीव कसा तुटू लागतो हे तुम्हालाही माहित असेल. आपण हवी तशी काळजी घेऊनही अनेकदा असं रोप जेव्हा सुकून जातं तेव्हा तर फारच वाईट वाटतं. मुळात रोपाच्या भरपूर वाढीसाठी त्याला योग्य प्रमाणात पोषक सत्व व पाणी- सूर्यप्रकाश आवश्यक असतं हे आपल्याला माहित असतंच पण काही वेळा नेमके कोणते पोषकसत्व रोपाला आवश्यक आहे हे लक्षात येत नाही.

तुम्हाला माहित आहे का? रोपांना नायट्रोजन, फॉस्फरस मिळाल्याने रोपांना हिरवी तजेलदार पाने व भरपूर कळ्या- फुले लागू शकतात. याशिवाय रोपांच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत मॅग्नेशियम, सल्फर हे घटक आवश्यक ठरतात. फोटोसिंथेसिस प्रक्रियेत या दोन्ही सत्वांचा फायदा होतो व परिणामी रोपाच्या प्रत्येक अंगाला आवश्यक तेवढे पोषण मिळून भरभर वाढ होऊ लागते. आज आपण फुलांच्या रोपाला वाढवताना ही दोन सत्व कशी मिळवून देता येतील हे पाहणार आहोत. यासाठी आपण अगदी तांदळासारख्या दिसणाऱ्या एप्सम सॉल्टचा (मीठ) वापर करायचा आहे.

Epsom salt हे मॅग्नेशियम सल्फेट (MgSO4) म्हणूनही ओळखले जाते. या मिठाचे मानवी आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. तर रोपांच्या वाढीला हे मीठ कसे हातभार लावते हे आज आपण SP गार्डनिंग मराठी या चॅनेलवर शेअर केलेल्या टिप्समधून जाणून घेणार आहोत. अनंताच्या रोपावर आपण हा प्रयोग पाहणार आहोत.

तर, एप्सम सॉल्ट टाकण्याआधी माती थोडी मोकळी करून घ्यावी, माती भुसभुशीत असल्यास ऑक्सिजनचा पुरवठा नीट होतो. आपल्याला आता एप्सम सॉल्टचे द्रावण बनवायचे आहे. १ लिटर पाण्यात १ चमचा एप्सम सॉल्ट मिसळून हे द्रावण तयार करता येईल. तुम्ही हे पाणी खत म्हणून देऊ शकता किंवा स्प्रे बॉटलमधून फवारा करू शकता. या मॅग्नेशियममुळे रोपांना हिरवीगार पाने येण्यासाठी मदत होऊ शकते. साधारण महिन्यातून दोन वेळा तुम्ही या पाण्याची फवारणी करू शकता.

हे ही वाचा<< २ रुपयांच्या खडूने मोगऱ्याचं रोप कळ्यांनी गच्च भरून जाईल; लहान कुंडीत फुलबाग सजवण्याचा उपाय, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंताच्या रोपाची पाने पटकन पिवळी पडतात हे टाळण्यासाठी सुद्धा तुम्हाला वरील उपाय कामी येऊ शकतो. तुमच्या बागेत सुद्धा हा प्रयोग करून पाहा आणि त्याचा कसा फायदा होतो हे कमेंट करून नक्की कळवा.