Kitchen Jugaad Video: आपल्यापैकी अनेक जण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. आपण सोन्याचे दागिने घरातील कपाट लाॅकरमध्ये ठेवतो. सहसा चोरी होण्याच्या भीतीने अनेक जण दागिने बँकेतील लॉकरमध्ये ठेवतात. तुम्हीही बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू ठेवल्या असतील. पण, तुम्ही कधी टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवले आहेत का, नाही ना? तुम्हीही हे वाचून चकित झाला असाल ना? टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवले, तर काय होईल, हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवल्याने काय फायदा होईल, असा जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. चला तर जाणून घेऊया…

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान, असाच एक आश्चर्यचकित करणारा अनोखा जुगाडाचा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही कधी टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवले आहेत का? नाही ना… मग एकदा ठेवून बघा. हा जुगाड तुमच्या समस्यांवर मात करील. टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवल्यानंतर सोन्यामध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून, या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोने हा अत्यंत चमकणारा धातू असला तरी सोन्याचे दागिने मात्र सतत अंगावर घातल्याने तसेच त्यातील नक्षीकामामध्ये घाण साचल्याने काही वेळेस त्याची चमक कमी होते. त्यासाठीच दागिने स्वच्छ करणे गरजेचे आहे. सोन्याचे दागिनेदेखील तुम्ही घरच्या घरी स्वच्छ करू शकता. जेणेकरून ते पुन्हा चमकतील. त्यावरच महिलेने व्हिडीओ शेअर करीत हटके जुगाड दाखविला आहे. काय दाखवले आहे, ते जाणून घ्या…

व्हिडीओत दाखविल्यानुसार, गृहिणीने टोमॅटोचे दोन भाग केले आहेत आणि एका भागाला सोन्याचे दागिने अडकवले. त्यानंतर त्यावर कापलेल्या टोमॅटोचा दुसरा भाग ठेवला आणि रबराच्या मदतीने तुम्ही त्याला ५ ते १० मिनिटे जोडून ठेवा, असे सांगितले. थोड्या वेळाने टोमॅटोच्या ज्या भागाला सोन्याचे दागिणे अडकवले आहेत त्या भागाला कापलेल्या टोमॅटोच्या दुसऱ्या भागाने घासा, अशी महिला सांगते. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन, ते दागिने स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्या. त्यामुळे तुमचे सोन्याचे दागिने पुन्हा नव्यासारखे चमकतील. हा प्रयोग तुम्हीदेखील करून पाहा, असे व्हिडीओ शेअर करीत त्या महिलेने सांगितले आहे. दागिने स्वच्छ करण्याचा हा एक सोपा घरगुती उपाय महिलेने शेअर केला आहे.

All in Ranjeeta या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, ते आम्हाला कमेंट करून कळवा.

येथे पाहा व्हिडीओ

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)