Kitchen Jugaad Video: गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून, ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. दरम्यान, असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी टिकल्यांच्या पाकिटांना पिठाचे गोळे चिकटवले आहेत का? नाही ना.. मग एकदा असं करून बघा. कारण- हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर मात करेल. झालेली कमाल पाहून तुम्हीही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून, या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं करायचं काय आणि कोणती समस्या कायमची दूर होणार जाणून घेऊया…
घरात उंदीर झाले की, सर्वांत मोठा त्रास होतो. दिवसभर आवरलेलं घर एका रात्रीत अस्ताव्यस्त करून टाकणारे हे जीव काही केल्या सहजासहजी जात नाहीत. स्वयंपाकघरात धान्य, कपाटातील कपडे, लाकडी सामान, अगदी वायरचीही वाट लावणाऱ्या उंदरांपासून सुटका मिळवणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. त्यावर उपाय म्हणून बाजारात पिंजरे, गोळ्या, औषधं मिळतात खरी; पण त्याचा प्रभाव कितपत टिकतो हाच प्रश्न असतो. त्याशिवाय लहान मुलं घरात असतील, तर काही उपाय धोकादायक ठरू शकतात.
पण सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट किचन जुगाड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टिकल्यांचं रिकामं पाकिट आणि थोडंसं गव्हाचं पीठ यांचा वापर करून उंदरांना घरातून पळवण्याचा दावा केला जातोय. ‘Indian Vlogger Pinki’ या यूट्यूब अकाऊंटवर एका गृहिणीने शेअर केलेला हा उपाय पाहून अनेक जण चकित झाले आहेत.
नेमकं काय करायचं?
या जुगाडासाठी काही खास साहित्य लागणार नाही. फक्त गव्हाचं पीठ घ्या आणि त्यात देशी तूप, घरात उरलेला कोणताही मसाला आणि एक्स्पायर झालेलं सिरप टाका. हे सगळं एकत्र करून पीठ मळा. मग त्याचे लहान लहान गोळे तयार करा. आता घरात जिथून उंदीर येतात किंवा सतत फिरत असतात, अशा ठिकाणी हे गोळे ठेवायचे. पण खरी गंमत तर पुढे आहे. दुसऱ्या टप्प्यात ती महिला सांगते की, तुम्ही टिकल्यांचं रिकामं पाकीट घ्या आणि त्यावर हे पिठाचे गोळे चिकटवा. हे पाकीट तुम्ही कपाटात, भांड्यांमध्ये किंवा कोपऱ्यांत सहजपणे ठेवू शकता.
आता प्रश्न असा पडतो की, या उपायाचा नेमका परिणाम काय होतो? हे पीठ खाल्ल्यावर उंदीर मरतात का? की पळून जातात? की पुन्हा परतच येत नाहीत? तर त्या व्हिडीओनुसार, या गोळ्यांमध्ये मिसळलेलं एक्स्पायर सिरप आणि मसाल्याचा वास उंदरांना प्रचंड त्रासदायक वाटतो. ते पीठ खाल्ल्यावर त्यांच्या पचनावर परिणाम होतो आणि ते तो परिसर सोडून पळ काढतात. मृत्यू नाही; पण त्यांच्यापासून घरातून कायमची सुटका, असाच दावा त्या गृहिणीने केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
तुम्हीही हा जुगाड करून पाहू शकता. परिणाम झाला का नाही, हे सोशल मीडियावर नक्की कळवा. पण एक लक्षात ठेवा, हा उपाय जितका साधा वाटतो, तितकाच तो परिणामकारकही ठरू शकतो!
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)