scorecardresearch

Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

लग्नासाठी शुभ मुहूर्त काढले जातात. अनेक वेळा मुलं-मुलीही शुभ मुहूर्तावर लग्न होण्यासाठी बराच वेळ थांबतात. काही दिवस हे लग्नासाठी अशुभ मानले जातात. जाणून घ्या सविस्तर…

Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

लग्नासाठी शुभ मुहूर्त काढले जातात. अनेक वेळा मुलं-मुलीही शुभ मुहूर्तावर लग्न होण्यासाठी बराच वेळ थांबतात. परंतु हिंदू ज्योतिष शास्त्रामध्ये काही दिवस लग्नासाठी इतके शुभ मानले जातात. उदाहरणार्थ अक्षय तृतीया आणि तुळशी विवाह दिवस यांसारख्या दिवशी लग्न कोणत्याही मुहूर्ताशिवाय केले जातात. दुसरीकडे धार्मिक शास्त्रात एक दिवस इतका अशुभ मानला गेला आहे की त्या दिवशी सर्व ग्रहस्थिती ठीक असली तरी लग्न करू नये. यामागे एक खास कारण आहे.

विवाह पंचमीला लग्न करू नका
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला विवाह पंचमी म्हणतात. या दिवशी लग्न करणं अत्यंत अशुभ मानलं जातं. वास्तविक, विवाह पंचमीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. या दिवशी, ८ डिसेंबर २०२१ रोजी विवाह पंचमी आहे. या दिवशी माता सीतेचा स्वयंवर झाला आणि रामाने धनुष्य तोडून राजा जनकाची अट पूर्ण केली. माता सीतेचे वैवाहिक जीवन खूप दुःखी असल्याने पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मिथिलांचल आणि नेपाळमध्ये या दिवशी विवाह केले जात नाहीत.

श्रीरामांनी सीतेचा त्याग केला होता
श्रीरामाशी विवाह झाल्यानंतर माता सीता त्यांच्यासोबत १४ वर्षे वनवासात राहिली. यानंतर वनवास पूर्ण झाल्यावर, अग्निपरीक्षा पार करूनही, श्रीरामांनी गर्भवती सीतेचा त्याग केला आणि एका आश्रमात लव-कुश या दोन पुत्रांना जन्म दिला. अशा दु:खी जीवनामुळे लोक विवाह पंचमीच्या दिवशी आपल्या मुलींचे लग्न लावून देत नाहीत, की आपल्या मुलीचे वैवाहिक जीवन सीतेच्या सारखे दुःखी होऊ नये.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 13:17 IST

संबंधित बातम्या