Vodafone Idea ग्राहकांना मिळतोय 50GB बोनस डेटा, जाणून घ्या डिटेल्स

Vodafone Idea ची शानदार ऑफर…

टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (vi) ने आपल्या 2,595 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनमध्ये 50 जीबी बोनस डेटाची ऑफर आणली आहे. ही ऑफर व्होडाफोन-आयडियाच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे रिचार्जसाठी उपलब्ध आहे. मात्र, कंपनीच्या वेबसाइटद्वारे रिचार्ज केल्यास बोनस डेटाचा लाभ मिळणार नाही.

2,595 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनची वैधता एक वर्षाची असून हा कंपनीच्या सर्वात महागड्या प्लॅन्सपैकी एक आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा FUP लिमिटसह मिळतो. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधाही मिळते. ग्राहक दररोज 100 एसएमएस पाठवू शकतात. तसेच, एका वर्षासाठी युजर्सना ZEE5 प्रीमियम सबस्क्रिप्शनही मोफत मिळतं. आता ग्राहकांना या प्लॅनमध्ये अतिरिक्त 50GB डेटा फ्री दिला जात आहे. 2,595 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोबाइल अ‍ॅपमध्ये ‘Extra 50GB’ असा उल्लेख करण्यात आला आहे. प्लॅन एक्स्पायर होईपर्यंत 50 जीबी डेटा वैध असेल. या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. ही ऑफर किती दिवसांपर्यंत उपलब्ध असेल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही, पण ही मर्यादित कालावधीची ऑफर असण्याची शक्यता आहे.

सामान्यपणे या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 730 जीबी डेटा मिळतो, पण आता बोनस डेटा ऑफरमुळे एकूण 780 जीबी डेटा वापरण्यास मिळणार आहे. ही ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध नाहीये, ही केवळ अ‍ॅप एक्सक्लूसिव ऑफर आहे. या प्लॅनमध्ये Vi Movies & TV Classic चाही मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. शिवाय ‘Weekend Data Rollover’ चा पर्यायही या प्लॅनमध्ये आहे. यानुसार युजर्स एका आठवड्यात (सोमवार ते शुक्रवार) बचत झालेला डेटा वीकेंड म्हणजे शनिवार आणि रविवारी वापरु शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vodafone idea offering 50gb bonus data with this prepaid plan check details sas