How to remove insects: पावसाळा सुरू झाला की, पावसाळ्यात उद्भवणारे कीटकही अचानक बाहेर येऊ लागतात. संध्याकाळनंतर दिवे चालू होताच हे कीटक घरात येतात. कीटकांची सर्वांत मोठी समस्या स्वयंपाकघरात निर्माण होते. जिथे स्वयंपाक करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण- ते अन्नात पडण्याचा धोका असतो, ज्यामुळे संपूर्ण अन्न खराब होऊ शकते. या समस्येमुळे लोक पावसाळ्यात दरवाजे आणि खिडक्यादेखील उघडू शकत नाहीत. जर तुम्हाला ही समस्या टाळायची असेल, तर आम्ही तुम्हाला पावसाळी कीटकांना दूर ठेवण्याचे मार्ग सांगणार आहोत.
पावसाळ्यात कीटकांपासून मुक्ती कशी मिळवायची?
बाहेरील दिवे चालू करा
घरात कीटक येऊ नयेत, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही घराबाहेरील दिवे सुरू ठेवा; जेणेकरून कीटक घराबाहेर राहतील.
लसणाचे द्रावण
पावसाळ्यातील कीटकांपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही लसणाचे द्रावण वापरू शकता. ते बनविण्यासाठी लसणाचा रस आणि पाणी १:६ या प्रमाणात एकत्र करा आणि मिसळा. त्यानंतर घरातील दिव्यांवर ते शिंपडा. त्याच्या वासामुळे कीटकांना दिव्यांपासून दूर ठेवता येईल.
कडुलिंबाचे तेल
पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या कीटकांना कडुलिंबाच्या तेलाच्या मदतीनेही दूर ठेवता येते. त्यासाठी जिथे जिथे कीटक दिसतील, तिथे तिथे कडुलिंबाचे तेल शिंपडा किंवा कडुलिंबाची पाने जाळून तुम्ही धूर करू शकता.