आपलं दैनंदिन जीवन इतकं धावपळीचंआहे की सकाळी उठल्यानंतर लगेच कामावर जायची लगबग सुरू होते. अनेक वेळा फील्ड वर्क किंवा कार्यालयात घालवले जाणारे १०–१२ तास आपण पायात बूट घालून सगळीकडे धावपळ करतो. अशा परिस्थितीमध्ये आपण असे बूट वापरतो ज्यामुळे दिवसभर धावपळ करताना त्रास होणार नाही. सतत बूट घालून राहणं आपल्या पायांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असा इशारा ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी दिला आहे.

दिवसभर पायात बुट घालून राहिल्यास केवळ त्वचेवरच परिणाम होत नाही तर स्नायू देखील कमकुवत होऊ शकतात. तसेच घाम आणि ओलावा यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि दुर्गंधीची समस्या उद्भवू शकते.

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाचे पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विकास बासा सांगतात की, बूट सतत घालण्याने पायांच्या स्नायूंमध्ये आकडतात येते आणि त्यांची लवचिकता कमी होते. त्यामुळे पाय हळू हळू कमकुवत होतात आणि त्याचा आकारही बिघडतो

डॉक्टरांनी सांगितले की दररोज बूट घालण्याची सवय दीर्घकाळात पायांच्या समस्या निर्माण करू शकते. दिवसभर बूट घालून राहिल्याने शरीरात कोणत्या समस्या उद्भवू शकतात. चला यबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

दिवसभर बूट घालण्याचे परिणाम (Health Problems Caused by Wearing Shoes All Day)

  • १. फोड व त्वचेचा रंग बदल – दिवसातील १२-१३ तास बूट घालून राहिल्यास त्वचेला सतत घर्षण होऊन फोड येऊ शकतात आणि त्वचेचा रंगही बदलतो.
  • २. बॅक्टेरियल आणि फंगल संसर्ग – भारतासारख्या दमट हवामानात पायांमध्ये अधिक घाम येतो. त्यामुळे बूटात ओलसरपणा तयार होतो जो संसर्गासाठी कारणीभूत ठरतो.
  • ३. प्लांटर फॅसिआइटिसचा धोका – ही एक व्याधी असून टाचेला तीव्र वेदना होते. पायाचे स्नायू कमकुवत झाल्यास ही समस्या उद्भवते.
  • ४. पोश्चर व चालणं बिघडणं – चुकीचा फिटिंगचा बूट किंवा आर्च सपोर्ट नसलेला पायाची चाल आणि मणक्यावर परिणाम करू शकतो.

भारतीयांमध्ये ही समस्या अधिक का? (Why Are These Foot Problems More Common Among Indians?)


भारतातील गरम आणि दमट हवामानामुळे बूटात घाम व ओलावा अधिक होतो त्यामुळे बुरशी संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. शिवाय, अनेक कामांमध्ये दीर्घकाळ उभं राहावं लागतं, ज्यामुळे टाचांवर अधिक दबाव येतो व वेदना वाढतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपाय काय?(How to Protect Your Feet From These Issues?)

  • जर तुम्ही दिवसभर बूट घालत असाल तर तुमची सवय थोडी सुधारा.
  • कामाच्या ठिकाणी ब्रेकमध्ये किंवा घरी बूट काढण्याची सवय लावा.
  • शक्य असेल तेव्हा स्लीपर किंवा सँडलचा वापर करा.
  • तुमचे पाय वर-खाली हलवणे आणि टाचा उंचावणे हे दोन व्यायाम आहेत जे तुमचे पाय आराम करण्यास मदत करू शकतात.
    आळीपाळीने बूट घाला, जेणेकरून तुमच्या पायांनाही श्वास घेण्याची संधी मिळेल.
  • दररोज एकच बूट न वापरता, बूट बदलत जा आणि त्यांना उन्हात वाळवा.यामुळे बॅक्टेरिया आणि वास कमी होतो.
  • योग्य आकाराचे आणि आधार देणारे शूज घाला, त्यामध्ये आर्च सपोर्ट आणि गादी असेल याची काळजी घ्या.

पाय हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची दैनंदिन बूट घालण्याची सवय लक्षात घेता, काही लहानसे बदल मोठ्या त्रासापासून वाचवू शकतात.