लठ्ठपणामुळे केवळ शरीराचे वजन वाढत नाही तर लोकांच्या व्यक्तिमत्त्वावरही त्याचा परिणाम होतो. फिटनेससाठी लोकं विविध पद्धतींचा अवलंब करतात. काही लोकं व्यायाम करून तर काही डायटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हेल्दी डाएट घेतल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. चला जाणून घेऊया, लोकांनी त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.

प्रथिनेयुक्त पदार्थ

तज्ज्ञांच्या मते, आहारात जास्त प्रोटीन घेतल्याने लोकं पोट भरलेले राहते. यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तज्ञांचे असे मत आहे की उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ दिवसाला ८० ते १०० कॅलरीजचे चयापचय करू शकतात. अशा परिस्थितीत लोकं त्यांच्या आहारात मसूर, सोया, हरभरा, चणे, राजमा, मका, अंडी, मासे आणि चिकन यांचा समावेश करू शकतात.

आहारात मका, बाजारी यासारख्या पदार्थांचा करा समावेश

वजन वाढवणे आणि कमी करणे या दोन्हीमध्ये तुमच्या जीवनशैलीत आहाराची भूमिका महत्त्वाची आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेक तुम्ही सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, शरीरात ऊर्जा राहते आणि शरीराला पोषण मिळते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाळी, ओट्स, मका, बाजरी, नाचणी आणि ज्वारी या पासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. तसेच आहारात व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राइस खा.

ताक पिणे

उन्हाळयात सर्वजण आवर्जून ताक पित असतो. ताक प्यायल्याने शरीर थंड तर राहतेच, पण वजन कमी होण्यासही मदत होते. पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आणि बीएमआय पातळी राखण्यासाठीही ताकाचे सेवन फायदेशीर आहे. ताक हे कमी कार्ब आणि उच्च प्रथिने असलेले पेय आहे जे लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहे. दुपारचे जेवण झाल्यानंतर ताकाचे सेवन केल्यास फायदा होईल.

भाज्या आणि फळांचा हिशोब काय आहे

आरोग्य तज्ञांचे मत आहे की लोकांनी आपल्या आहारात विविध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यांच्या मते, लोकांनी त्यांच्या जेवणाच्या ताटात किमान दोन हंगामी भाज्या आणि दोन फळांचा समावेश करावा. अशा प्रकारे आहाराचे नियोजन केल्यास शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात. याने तुमचे वजन देखील वाढणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)