Weight loss tips : ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे, त्यांनी व्यायाम, योगासने याशिवाय त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. चांगला आणि सकस आहार लवकर वजन कमी करण्यास मदत करतो. भात, बटाटे, साखर असे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकांना वाटते. अशा परिस्थितीत, लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन कमी करतात किंवा बंद करतात. केवळ काही पदार्थ न खाल्ल्याने फॅट बर्न होते असं नाही, तर त्यासाठी काही विशिष्ठ पदार्थांचा देखील आहारात समावेश केला पाहिजे. भारतातील बहुतेक घरांमध्ये नाश्त्यात पोहे खाल्ले जातात. पोहे भातापासूनच तयार केले जातात, पण भात वजन वाढवणारा मानला जात असला तरी पोहे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. तुम्हालाही पोहे खायला आवडत असतील तर त्याचे फायदे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोहे हा उत्तर भारतातील विशेषत: इंदूरमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. पोहे हे पौष्टिक अन्न आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आहारतज्ञांच्या मते, पोहे खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात पोह्यांचा समावेश करावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight loss tips nclude poha in your diet for weight loss gps
First published on: 09-06-2022 at 12:32 IST