पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांची पदभरती निघाली असून त्यासंभदर्भात जाहिरात प्रसिध्द झाली आहे. पात्र उमेदवारांकडून आज, मंगळवारपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. तब्बल ३५५३ जागांसाठी ही पदभरती निघाली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर rrc-wr.com यासंदर्भातची आधिक माहिती तुम्हाला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १५ आणि कमाल वय २४ वर्ष असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट देण्यात आली आहे.

शैक्षणिक अट – अर्ज करणाऱ्या उमेदवाराची प्रतिष्ठित बोर्डातून ५५ टक्के गुणांसह दहावी पास असावी. तसेच त्याच्याकडे ITI प्रमाणपत्रही बंधनकारक आहे.

प्रवेश शुल्क – जनरल कॅटेगरीमधील उमेदवारला १०० रूपये शुल्क असेल. तर महिला आणि आरक्षित वर्गाच्या उमेदरांना कोणतेही शुल्क नाही.

For more details, candidates are advised to read the official notification here:

 

इथे क्लिक करूनही जाहिरात पाहू शकता

अर्ज दाखल करण्यासाठी इथं क्लिक करा

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway recruitment 2020 3553 vacancies of apprentices notified nck
First published on: 07-01-2020 at 11:16 IST