Raw Papaya Juice benefits: फळांचा विचार केला तर पपईचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. पपईचा गोडवा आणि पचनाच्या फायद्यांसाठी डॉक्टर आहारात समावेश करण्याची शिफारस करतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की कच्च्या पपईचेही बरेच फायदे आहेत. विशेषतः रसाच्या स्वरूपात, कच्च्या पपईमुळे तुम्हाला असे अनेक आरोग्य फायदे मिळतात.. हो, ते थोडे कडू असते, परंतु एकदा तुम्हाला चवीची सवय झाली की, ते तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत एक महत्त्वाची भूमीका बजावते. त्याच्या पौष्टिकतेमुळे, कच्च्या पपईचा रस तुमच्या शरीरासाठी अनेक मार्गानी फायदे देतो. जेव्हा तुम्ही कच्च्या पपईचा रस पिता तेव्हा तुमच्या शरीराचे काय परिणाम होतो चला जाणून घेऊयात.
१. नैसर्गिकरित्या पचनक्रिया वाढवण्यास मदत करते
जर तुम्ही तुमची पचनक्रिया सुरळीत करण्याचा मार्ग शोधत असाल, तर कच्च्या पपईचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याचे कारण पपेन नावाचे एंजाइम आहे. २०२३ च्या संशोधनानुसार, ते नियमितपणे प्यायल्याने अपचन, आम्लता आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
२. शरीर थंड होण्यास मदत करते
तुमच्या शरीरातील हायड्रेशन पातळीबद्दल काळजी वाटते का? कच्च्या पपईचा रस मदत करू शकतो. USDA च्या आकडेवारीनुसार, कच्च्या पपईमध्ये सुमारे ८८ टक्के पाणी असते, जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. जेव्हा तुम्ही त्याचा रस पिता, तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते.
३. वजन कमी करण्यास मदत करते
वजन कमी करण्यासाठी कच्च्या पपईचा रस उत्तम ठरू शकतो. हा रस फायबर आणि एन्झाईम्सने भरलेला असतो, जो तुमचे चयापचय आणि पचनक्रिया कार्यक्षम ठेवतो. शिवाय, कच्च्या पपईच्या रसात कॅलरीज कमी असतात आणि त्यात भरपूर स्टार्चदेखील असते, म्हणून सकाळी किंवा तुमच्या मुख्य जेवणासोबत हा रस प्यायल्याने पचनाच्या समस्या टाळता येतात आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ दूर राहण्यास मदत होते.
४. तुमची त्वचा स्वच्छ करते
कच्च्या पपईचा रस हा स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त, कच्च्या पपईचा रस व्हिटॅमिन सीनेदेखील भरलेला असतो, जो शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी ओळखला जातो. खरं तर हा रस प्यायल्याने मृत त्वचेच्या पेशी विरघळण्यास आणि जुन्या पेशी दुरुस्त करण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा आतून टवटवीत होण्यास मदत होते. पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य प्रशिक्षक शिल्पा अरोरा यांच्या मते, “कच्च्या फळातील फायबर शरीरातील कोणत्याही विषारी पदार्थांपासून शरीराला आतून स्वच्छ करते, म्हणून दररोज कच्च्या पपईचे सेवन केल्याने मुरुमे, डाग आणि रंगद्रव्य यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.”
५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
अँटिऑक्सिडंट्स, एन्झाईम्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण, कच्च्या पपईचा रस तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. ते मुक्त रॅडिकल्सशी लढते, जळजळ कमी करते आणि किरकोळ संसर्ग किंवा थकवा झाल्यानंतर तुमच्या शरीराला जलद बरे होण्यास मदत करू शकते. हा रस विशेषतः ऋतू बदलांच्या वेळी उपयुक्त आहे, जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा या रसाचे सेवन केल्याने लक्षणीय फरक पडू शकतो.
६. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम
हे अशा लोकांसाठी आहे, जे दिवसातून तासनतास स्क्रीनकडे पाहत राहतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी कच्ची पपई आहारात एक अद्भुत भर आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कच्च्या पपईमध्ये कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण चांगले असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए तयार करण्यासाठी वापरले जाते. खरं तर कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण गाजर आणि टोमॅटोपेक्षा जास्त आहे, म्हणून हा रस तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या एकूण शरीरासाठी उत्तम ठरू शकतो; तर आजच तुमच्या आहारात कच्च्या पपईच्या रसाचा समावेश करा.