Homemade Spray For Mosquitoes : हवामानातील बदलामुळे डासांचा धोका वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत, स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला डासांपासून सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची क्रीम, तेल, लोशन आणि स्प्रे उपलब्ध असतात. पण, हे सर्व बनवण्यासाठी अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकला असे आजार आपल्याला उद्भवतात. त्यामुळे त्यांचा जास्त काळ वापर आरोग्यासाठी चांगला नसतो. मुलांची त्वचा संवेदनशील असते. जर तुमच्या घरात खूप डास असतील, तर तुम्ही नैसर्गिकरित्या डासांना दूर करण्यासाठी दोन प्रकारचे स्प्रे घरीच बनवू शकता.
डासांना दूर करण्यासाठी कसा बनवायचा स्प्रे?
साहित्य
- ४ ते ५ चमचे कारल्याची पाने किंवा रस
- ८ ते १० पाकळ्या लवंग
- २ चमचे कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल
- १ चमचा लिंबाचा रस
- १ कप पाणी
- स्प्रे करण्याची बाटली
कृती
- स्प्रे बनवण्यासाठी सगळ्यात पहिला १ कप पाण्यात लवंग घाला.
- थोडा वेळ थंड होऊ द्या.
- नंतर, त्यात कारल्याचा रस, कडुलिंबाचा रस किंवा तेल, लिंबाचा रस घाला. मिश्रण गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत ओता.
२. डांस दूर करणारा दुसरा स्प्रे
साहित्य
- २ चमचे बेकिंग सोडा
- ५ तमालपत्र
- २ चमचे लवंग
- २ कप पाणी
कृती
- एका पॅनमध्ये दोन कप पाणी घ्या; त्यात लवंगा घाला. थोडा वेळ उकळू द्या, नंतर तमालपत्र, बेकिंग सोडा घाला.
- आता, मिश्रण अर्धे होईपर्यंत उकळून घ्या आणि मग थंड होऊ द्या.
- मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर, स्प्रे बाटलीत ओता.
- अशा प्रकारे, तुमचा नैसर्गिक डास प्रतिबंधक स्प्रे तयार आहे.
तुम्ही हे दोन्ही स्प्रे टेबलावर, भिंतीच्या कोपऱ्यात फवारू शकता.
