Morning Habits That Can Help Lower Morning Cortisol Level : कोर्टिसोल हा एक स्टेरॉइड हार्मोन आहे, जो आपल्या शरीरातील अधिवृक्क ग्रंथी तयार करतात. या हार्मोनचे शरीरात अनेक महत्त्वाचे कार्य असतात; जसे की अन्नाचे पचन, रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करणे इत्यादी. पण, कॉर्टिसोलचं एक खास काम म्हणजे तणाव (स्ट्रेस) नियंत्रण करणे; त्यामुळे याला ‘स्ट्रेस हार्मोन’ असंही म्हणतात. तर कधी कधी कॉर्टिसोल उपयोगी असतो. तणावाच्या वेळेस शरीराला योग्य प्रतिसाद द्यायला मदत करतो. पण, जर कॉर्टिसोलची पातळी खूप जास्त असेल तर त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जसे की थकवा, झोप न लागणे, वजन वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

तर सकाळी कॉर्टिसोलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे दिवसभराच्या कामांसाठी शरीराला तयार करण्यास मदत होते. याला कॉर्टिसॉल अवेकनिंग रिस्पॉन्स (CAR) असेही म्हणतात, त्यामुळे सकाळी कॉर्टिसोलच्या पातळीचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे दिवसभर तुम्हाला शांत राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर पहिल्या १ ते २ तासांत तुम्ही काही सवयी फॉलो केल्यास तुमचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. तर पुढील काही सवयी कॉर्टिसोल लेव्हल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात…

कॉफी पिणे टाळा

सकाळी उठल्यानंतर लगेच कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोलची पातळी वाढते, कारण सकाळी उठताच कॉर्टिसोलची पातळी नैसर्गिकरित्या सर्वात जास्त असते. कॅफिन अधिवृक्क ग्रंथींना उत्तेजित करते, ज्यामुळे तुमचा ताण वाढू शकतो. त्याऐवजी पाणी किंवा हर्बल टी प्या. कॉफी प्यायचीच असेल तर किमान ६० ते ९० मिनिटे थांबा.

फोन चेक करू नका

सकाळी उठून सोशल मीडिया, बातम्या किंवा कामाच्या ठिकाणी येणारे मेसेज पाहिल्याने तात्काळ ताण निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते. झोपेतून उठल्यानंतर ३० ते ६० मिनिटांनंतर फोन बघा. यामुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते…

सूर्यप्रकाशात राहा

उठल्यानंतर पहिल्या एक तासात नैसर्गिक प्रकाश तुमच्या सर्कॅडियन लयचे नियमन करण्यास मदत करू शकतो. सूर्यप्रकाशात राहिल्याने दिवसभर कॉर्टिसोल कमी करण्यास मदत होते. सकाळचा सूर्यप्रकाश सेरोटोनिनला उत्तेजित करतो. नंतर त्याचे मेलाटोनिनमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे झोप सुधारते आणि तणावाची पातळी कमी होते.

नाश्ता करा

नाश्ता वगळल्याने किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते; ज्यामुळे कॉर्टिसोलचे उत्पादन सुरू होते. निरोगी चरबी आणि कॉम्प्लेक्स कार्ब्ससह प्रथिनेयुक्त नाश्ता रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हायड्रेट रहा

डिहायड्रेशनमुळे शरीरावर ताण येतो, ज्यामुळे कॉर्टिसोल सोडण्यास सुरुवात होते. त्यामुळे सकाळी उठताच एक ग्लास पाणी प्यायल्याने पेशींचे पुनर्जलीकरण होण्यास मदत होते, चयापचय सुधारतो आणि अधिवृक्क ग्रंथींचा प्रतिसाद कमी होतो.