What Is The Best Time Of Day To Eat Bananas : भूक लागल्यावर घरी काहीच नसेल, तर आपण एक केळं खातो. केळे हा पोषक तत्त्वांचा स्रोत आहे. त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६, फायबर व मॅग्नेशियम असते. पण, हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतात, जेव्हा तुम्ही योग्य वेळी केळीचे सेवन करता. योग्य वेळेत केळी खाल्ल्यावर शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि चुकीच्या वेळी खाल्याने झोप खराब होऊ शकते.
तर, केळी नेमकी कधी आणि कोणत्या वेळेत खाल्ली पाहिजेत याबद्दल जाणून घेऊयात…
केळी खाण्याची योग्य वेळ
नाश्त्यानंतर किंवा नाश्ता करताना…
नाश्त्यानंतर किंवा नाश्ता करताना केळी खाल्ल्याने दुपारपर्यंत भूक लागत नाही. त्याचबरोबर कमी पिकलेल्या केळ्यामध्ये सुमारे तीन ग्रॅम फायबर असते आणि त्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो, जो लवकर पचत नाही. त्यामुळे जास्त काळ पोट भरलेले राहते आणि पचनास मदत होते. त्याशिवाय, केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते; जे ऊर्जा, चयापचय व रोगप्रतिकार शक्तीलादेखील समर्थन देते.
व्यायामापूर्वी ऊर्जा देणारे पदार्थ
व्यायामापूर्वी नैसर्गिक ऊर्जा वाढवायची असेल, तर केळी खा. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सही असतात; जे १५ ते ३० मिनिटांत पचतात आणि शरीराला जलद इंधन देतात. त्याचबरोबर स्नायूंच्या कार्याला समर्थन देण्यासाठी केळ्यामध्ये पोटॅशियमसह कार्बोहायड्रेट्ससुद्धा असतात.
जेवणात केळ्याचा समावेश करा
जेवणात केळ्याचा योग्यरीत्या समावेश केल्यास त्यातील फायबर आणि स्टार्च आतड्यातील चांगल्या जंतूंना अन्न पुरवतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि आतडे निरोगी राहते. आतड्यांसाठी अनुकूल जीवाणूंचे पोषण होते. रेझिस्टंट स्टार्च असणारी ही केळी प्री-बायोटिक्स म्हणून काम करतात. पण, महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत असेल, तर केळ्याचे सेवन करताना संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. केळ्याबरोबर जर प्रोटीन किंवा चांगले फॅट्स असणारे पदार्थ म्हणजे दही, सुका मेवा खाल्ल्यास शरीराला त्यातून हळूहळू ऊर्जा मिळते.
लक्षात ठेवण्याच्या बाबी…
- जर तुम्हाला संध्याकाळी नीट झोप येत नसेल, तर तुम्ही केळी खा. कारण- त्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असते; जे स्नायूंना आराम देते, बी6 व जे मेलाटोनिन उत्पादनास मदत करते.
- पण, काही संशोधनांमध्ये असा इशारा देण्यात आला आहे की, संध्याकाळी उशिरा केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ होऊ शकते, ज्यामुळे काहींची झोप बिघडू शकते.
केळी खाण्याची अयोग्य वेळ
काही तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, केळी खूप पिकलेली असतात तेव्हा त्यांचे सेवन केल्यास लगेच ऊर्जा वाढते आणि त्यानंतर ती क्रॅश होऊ शकते किंवा संवेदनशील व्यक्तींमध्ये सौम्य पचनक्रिया बिघडू शकते. आदर्श तत्त्वानुसार, रिकाम्या पोटी केळी खाऊ नका; ती पचन मंदावणाऱ्या गोष्टींबरोबर खाण्याचा प्रयत्न करा.
मग सकाळी की संध्याकाळी; केळी नक्की कधी खावी?
- नाश्त्यापूर्वी किंवा व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास, ती ऊर्जा आणि पचनासाठी उत्तम ठरतात.
- तसेच झोपण्यापूर्वी केळी खाल्यास शांत झोप लागते. पण, याउलट रक्तातील साखरेच्या पातळीची सुद्धा वाढ होऊ शकते. त्यामुळे दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरावर अवलंबून असतात.
- फक्त रिकाम्या पोटी केळी खाऊ नका.