Retirement Age : अनेकजण वयाच्या १८ व्या वर्षापासून कामाला सुरुवात करतात ते म्हातारे होईपर्यंत काम करत राहतात. यात जेव्हा आपण काम करण्यास सुरुवात करतो तेव्हा सर्व गोष्टींशी जुळवू घेण्यास वेळ लागतो. कामाचा फारसा अनुभव नसतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी वेळ जातो. यात ऑफिसमध्ये कामासंदर्भात दररोज अनेक नव्या गोष्टी शिकतो. या शिकलेल्या गोष्टींतून चांगलं काम करण्यासाठी आपण धडपडतो. यामागे काहीतरी शिकण्याची धडपत असते पण यातून आपल्याला कामाचं फळ अर्थात पैसाही मिळत असतो. वयाच्या वयाच्या १८ ते ३० दरम्यान आपण अनेक जॉब बदलतो, फिल्डमध्ये किंवा फिल्ड सोडून दुसऱ्या कंपनीत, ऑफिसमध्ये काम करु लागतो.

वयाच्या ४० ते ५० पर्यंत पोहोचतो तेव्हा काम करत राहणं आणि ऑफिसला जाणं एक सवय बनते. या वयात काम करत असताना मेहनतीसाठी जर पुरेसा मोबदला मिळत असे आणि तुम्ही ध्येयाच्या अगदी पोहचता तेव्हा निवृत्ती घेण्याची अजिबात इच्छा होत नाही. बहुतेक कंपन्यांमध्ये सेवानिवृत्तीचे सर्वसामान्य वय ६० वर्षे आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील बहुतांश लोकांना निवृत्तीचे वय ओल्यांडल्यानंतरही काम करत राहणे आवडते. पण निवृत्ती घेण्याआधी प्रत्येकाने आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण भविष्यात काय होईल सांगता येत नाही. महागाई, वैद्यकीय खर्च निवृत्तीनंतर परवडेलचं असे नाही. यामुळे निवृत्तीनंतरच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून किंवा जमावलेल्या पैशात जगणे अशक्य होईल.

निवृत्तीचे योग्य वय काय आहे?

बहुतेक सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होतात. पण खाजगी क्षेत्रातील बहुतांश लोकं ५८ वर्षी निवृत्त होण्याचा विचार करतात. भारतात निवृत्तीचे वय ५८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान आहे. पण जर तुम्ही त्याचे बारकाईने विश्लेषण केले तर निवृत्तीचे ठरावीक असे वय नाही. हे व्यक्तीच्या वैयक्तिक गरजांवर-व्यावसायिक उद्दिष्टे, आर्थिक परिस्थिती आणि मानसिक समाधान यावर अवलंबून असते. मात्र निवृत्तीपूर्वी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. यासाठी वयाच्या ३० व्या वर्षीच सुरुवात करणे हिताचे ठरते.

निवृत्ती घेण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टींचा विचार करा.

१) वाढलेले आयुर्मान:

गुणवत्तापूर्ण राहणीमानामुळे व्यक्तीचे सरासरी आयुष्य वाढतेय. याला काही अपवादही आहेत, वाढत्या आयुर्मानात निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक गोष्टींसह अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल.

२) वाढती महागाई:

सतत वाढती महागाई ही एक मोठी समस्या आहे.यामुळे राहणीमानाचा खर्च वाढत आहे. निवृत्तीनंतर याची झळ जास्त जाणवण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतर पैसे मिळविण्याची क्षमता कमी होते त्यामुळे अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती सांभाळून घ्यावी लागेल.

३) वाढते वैद्यकीय खर्च:

वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय औषधांचा खर्च परवडल्यापलीकडे गेला आहे. मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग आदी आजारांच्या औषधांचा खर्च दरमहा वाढतोय. यामुळे निवृत्तीपूर्वी वैद्यकीय खर्चासाठी नियमित तरतूद करून ठेवावी लागेल.

४) विभक्त कुटुंब पद्धती :

हल्ली वाढत्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लग्नानंतर मुलगा आई- वडिलांना सांभाळेच याची खात्री देता येत नाही. यामुळे आई – वडिलांना निवृत्ती आधी आपल्याजवळ थोडेफार पैसा जमावून ठेवायला हवा.

५) पेन्शन नसलेल्या नोकऱ्या:

आता निवृत्तीनंतर पेन्शन देणाऱ्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. आता सरकारी नोकरीतही २००५ नंतर रूजू होणाऱ्या व्यक्तीला सरकार आता पेन्श देणार नाही. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व्यवस्था ज्याची त्याला करावी लागणार आहे.

या मुद्द्यांचा विचार करून सेवानिवृत्त होण्याचा केला पाहिजे. तसेच निवृत्तीआधी विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याची प्रक्रिया सुरु केली पाहिजे. पण ही गुंतवणूक सध्याचे वय, खर्च, निवृत्तीचे वय पाहून केली पाहिजे.