डेस्कटॉपसाठी तयार होतंय नवं व्हॉट्सअ‍ॅप!, विंडोज आणि मॅकओएससाठी तयारी सुरू

व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी अपडेट केले जात आहे. हे मोबाइल अ‍ॅप असले तरी, डेस्कटॉपसाठी ऑप्टिमाइझ केलं आहे.

WhatsApp-4
डेस्कटॉपसाठी तयार होतंय नवं व्हॉट्सअ‍ॅप!, विंडोज आणि मॅकओएससाठी तयारी सुरू (Reuters Photo)

सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचं नाव प्रत्येकाच्या तोंडावर आपसूक येतंच. कारण गेल्या काही वर्षात सर्वाधिक संवाद या अ‍ॅपच्या माध्यमातून साधला जात आहे. लॉकडाउनच्या काळात तर कंपनी कर्मचारी एकमेकांशी या माध्यमातून कामं करत आहेत. त्यामुळे या अ‍ॅपची दिवसागणिक लोकप्रियता वाढली आहे. लोकांच्या चांगल्या अनुभवासाठी व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी अपडेट केले जात आहे. हे मोबाइल अ‍ॅप असले तरी, डेस्कटॉपसाठी ऑप्टिमाइझ केलं आहे. मात्र भविष्याचा विचार करता डेक्सटॉपसाठी नवं व्हॉट्सअ‍ॅप सुरु करण्याची तयारी सुरु आहे. कंपनी Windows आणि macOS साठी पूर्णपणे नवीन अ‍ॅप्लिकेशन विकसित करत आहे.

Aggiornamenti Lumia या साइटने स्क्रीनशॉट आणि gif फाइल शेअर केल्या आहेत, जे नवीन सॉफ्टवेअर कसे दिसेल आणि त्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय असतील हे दाखवतात. व्हॉट्सअ‍ॅप UWP (युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म, अ‍ॅपला Xbox वर देखील वापरण्याची परवानगी देते) हे सेमी-पारदर्शक पॅनेलसह Windows 11 नुसार डिझाइन केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. टच-स्क्रीन डिस्प्लेसह उपकरणांसाठी अगदी व्यवस्थित असेल. सामान्य, खाती, चॅट, नोटिफिकेशन्स, स्टोरेज, मदत अशा सहा श्रेणींमध्ये सेटिंग्जची विभागणी केली जाईल. अ‍ॅप बरेच काही Skype One सारखे दिसतंय. परंतु काही डिझाइन पूर्वीसारखेच राहतील अशीही चर्चा आहे.

GSM Arena च्या मते, नवीन सॉफ्टवेअर macOS वर देखील येत आहे. परंतु काही नवीन विकसित केले जाईल की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Whatsapp developing for windows and macos desktop rmt

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!