Diwali 2023 Dates & Shubh Muhurta: रावणाचा वध करून आणि १४ वर्षांचा वनवास भोगून भगवान श्रीराम अयोध्येत परतले. या आनंदात अयोध्यावासीयांनी तुपाचे दिवे लावून संपूर्ण अयोध्या उजळून टाकली आणि इथूनच खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली. अश्विन कृष्ण द्वादशी पासून यम द्वितीया म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा सण साजरा केला जातो. यंदा अधिक श्रावण आल्याने एरवी ऑक्टोबरच्या शेवटाकडे येणारी दिवाळी दोन आठवडे पुढे ढकलली गेली आहे. आता दसरा नुकताच सरल्यावर तुमच्याकडेही या सगळ्या तयारीला सुरुवात झाली असेलच हो ना? तुमच्या हातात नेमके किती दिवस शिल्लक आहेत व काय- कसे नियोजन करायला हवे हे ठरवण्यासाठी दिवाळीच्या २०२३ मधील मुख्य तारखा, तिथी व शुभ मुहूर्त जाणून घेऊया..

दिवाळी २०२३ महत्त्वाच्या तारखा, शुभ मुहूर्त

धनत्रयोदशी तिथी: १० नोव्हेंबर २०२३ शुक्रवार
शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटे ते ७ वाजून ४३ मिनिटे

छोटी दिवाळी/ वसुबारस तिथी: ११ नोव्हेंबर २०२३ शनिवार
शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिटे ते ८ वाजून १६ मिनिटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन तिथी: १२ नोव्हेंबर २०२३ रविवार
शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटे

बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा तिथी: १३ नोव्हेंबर २०२३ सोमवार
शुभ मुहूर्त: ६ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजून ३५ मिनिटे

भाऊबीज तिथी: १४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार
शुभ मुहूर्त: दुपारी १ वाजून १० मिनिटे ते दुपारी ३ वाजून २२ मिनिटे

तुम्हाला सगळ्यांना आगामी दिवाळीच्या आणि दिवाळीच्या तयारीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा!