अलिकडे हृदयरोगांचा धोका तरूणांनाही जास्त होत आहे. बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढत आहे. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि तब्येत बिघडवून घेतात. अशात तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर हृदय निरोगी ठेवण्याशिवाय पर्याय नाही. ते निरोगी ठेवण्यासाठी काही खास आहार घ्यावा लागेल. शहरांमध्ये राहणारे लोक पॅकेटमधल्या पिठाचा वापर करतात. कारण त्यांची जीवनशैली गावात राहणाऱ्या लोकांपेक्षा इतकी वेगळी आहे की त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने हे हाणीकारक आहे. खरं तर, अनेक आरोग्य तज्ञांच्या मते, आपण ज्या प्रकारचे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

पण पॅकेटमधल्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होते. इतकंच नाही तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे अनेक गंभीर आजार होतात. अशा परिस्थितीत आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पीठ कोणते खावे असा प्रश्न पडतो.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

आरोग्यासाठी घातक

आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या पिठात अनेक प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह्ज टाकली जातात ज्यामुळे जे धान्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व पूर्णपणे नष्ट करते. या पिठात फायबर अजिबात नसते. अशा स्थितीत पॅकबंद रोटी पचवणे खूप अवघड असते. पीठ पांढरे आणि चांगले दिसण्यासाठी त्यात निकृष्ट दर्जाचे तांदळाचे पीठ टाकले जाते. पीठ लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात केमिकल्सही टाकले जातात. पॅकेज केलेले पीठ खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

बनावट पीठ ओळखण्यासाठी, एक चमचे पीठ एका टेस्ट ट्यूबमध्ये घाला. नंतर तीन मिली अल्कोहोल घाला आणि मिश्रणाने मिसळा. नंतर हायड्रोक्लोरिक एसिडचे १० थेंब घाला. जर मिश्रणाचा रंग गुलाबी झाला तर मग समजून घ्या की त्यात मेटानिल येलोची भेसळ झाली आहे.

हेही वाचा >> पाठदुखीची समस्या सोडत नाही पाठ? ‘या’ एका आसनाने मिळेल फायदा

कोणत्या पिठाचा समावेश करावा

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याची विशेष काळजी असते मात्र अशा स्थितीत तु्म्हाला ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची असेल तर पॅकेट पीठाता आहारात समावेश करण्याऐवजी तु्म्ही मल्टीग्रेन पीठ वापरू शकता पण यातील महत्वाची गोष्ट म्हणजे हे ही पीठ पॅकेट बंद नसावे.अनेकवेळा तुम्ही तुमच्या घराजवळील गिरणीतून पीठ आणू शकता कारण ते चांगले असते. ज्या पीठात कोंडा जास्त असतो ते पीठ पचनासाठी चांगले असते. या पीठात फायबर असल्याने यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहण्यास मदत राहतो.