Food items should not cooked in pressure cooker: प्रेशर कुकरचा वापर घरोघरी केला जातो. रोजच्या रोज भात शिजवण्यापासून ते अनेक गोष्टींसाठी प्रेशर कुकर उपयोगी पडतो. अगदी झटपट कोणती गोष्ट शिजवायची असेल, तर प्रेशर कूकर कामी येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, असे काही पदार्थ आहेत जे प्रेशर कुकरमध्ये तुम्ही शिजवू नयेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे पदार्थ शिजवणे अधिक हानिकारक मानले जाते आणि त्यामुळे पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. चला तर मग या पदार्थांबद्दल अधिक जाणून घेऊ या…

तांदूळ (भात)

बहुतांश लोक वेळेअभावी प्रेशर कुकरमध्ये भात शिजवतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर लगेच थांबा.
कूकरमध्ये बनवल्याने या स्टार्चमधून एक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर पडते जे शरीरासाठी हानिकारक असते.

भाज्या

भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यात खनिजे, जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो जे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. म्हणूनच तज्ञदेखील या गोष्टीशी सहमत आहेत की बहुतेक भाज्या विशेषतः हिरव्या पालेभाज्या पॅन किंवा कढईमध्ये शिजवल्या पाहिजेत.

पास्ता

प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास पास्ता जास्त स्टार्चयुक्त बनतो. तो एका पॅनमध्ये उकळवा आणि ते अधिक निरोगी बनवण्यासाठी अतिरिक्त पाणी फेकून द्या.

मासे

मासे खूप लवकर शिजतात आणि त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने ते विघटित होऊ शकते आणि डिश खराब होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बटाटे

आपण बहुतेकदा प्रेशर कुकरमध्ये बटाटे उकळतो, पण भाताप्रमाणे बटाट्यांमध्येही भरपूर स्टार्च असते. हेच कारण आहे की या प्रेशर कुकरमध्ये उकळणे किंवा स्वयंपाक करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. जर तुम्ही तरीही कुकर वापरण्याचा विचार करत असाल तर भरपूर पाणी घाला आणि स्वयंपाक केल्यानंतर तो पूर्णपणे धुवा.