Healthy Oils For Cooking : आपण काय खातो याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडू शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे की, आजच्या युगात आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बीपी, लठ्ठपणा, शुगर यासह अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण घरी तयार केलेल्या अन्नामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या योग्य नाहीत किंवा अन्न बनवण्याची पद्धती चूकीच्या आहेत.
हे सर्व सहसा आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या तेलापासून सुरू होते, जे आपण आपले अन्न शिजवण्यासाठी वापरतो. रिफाइंड तेल हे असेच एक तेल आहे जे भारतीय घरांमध्ये नियमितपणे वापरले जाते. त्यामुळे अन्नाची चव निश्चितच चांगली होते, पण त्याचे जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्याही उद्भवू शकतात. रिफाइंड तेलाचे अनेक पर्याय आहेत जे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता.
काय आहे रिफाइंड तेलासाठी पर्याय
नारळ तेल ( Coconut Oil)
दक्षिण भारतात नारळाचे तेल सर्रास वापरले जाते, परंतु आता अधिकाधिक लोक त्यांच्या आहारात या तेलाचा समावेश करू लागले आहेत. खोबरेल तेल वजन कमी करण्यासह अनेक आरोग्य फायदे देते.
हेही वाचा – पावसाळ्यात ओलसरपणा अन् दुर्गंधीचं टेन्शन घेऊ नका! ‘या’ सोप्या टिप्स वापरून पाहा, घरात पसरेल सुगंध
ऑलिव्ह तेल (Olive Oil)
निरोगी तेलांमध्ये ऑलिव्ह ऑइल हा एक चांगला पर्याय आहे. हे तेल अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड फॅटने समृद्ध आहे. हे तेल व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्रोत आहे, जे हृदयाच्या चांगल्या आरोग्याशी संबधित महत्त्वाची भूमिका बजावते. ऑलिव्ह ऑइलचा वापर कमी ते मध्यम आचेवर अन्न शिजवण्यासाठी केला जातो, कारण ते जास्त तापमानात गरम केल्यावर त्याचे काही फायदेशीर गुणधर्म गमावू शकतात.
तूप (Ghee)
तूपाचे सेवन करण्याबाबत अनेक लोकांचा असा समज असतो की त्यामुळे तुम्ही जाड व्हाल. बहूतेक लोक विचार करतात की, तूप खाण्यामुळे वजन वाढते. पण हे अगदी चूकीचे आहे. जर तुम्ही ठराविक प्रमाणात सेवन केले तर प्रत्यक्षात ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तूप हे ओमेगा ३ ने समृद्ध असते जे फॅट्सचे विघटन करण्याचे काम करते आणि तुम्ही त्वरित वजन कमी करण्यास मदत करू शकते.
हेही वाचा – Monsoon Makeup : पावसाळ्यात सुंदर दिसण्यासाठी ‘या’ लिपस्टिक शेड्स करा ट्राय! मिळेल हटके लूक
जवसाचे तेल ( Flaxseed Oil)
जवसाचे तेल देखील रिफाइंड तेलाचा एक चांगला पर्याय आहे. यापैकी जवासच्या बियांपासून जवसाचे तेल काढले जाते. यामध्ये रक्तात विघरळणारे फायबर्स आणि ओमेगा ३ असतात जे तुमचे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. जवसाच्या बियांचे तेल स्वयंपाकासाठी उपयुक्त नसते कारण ते त्याचा स्मोक पॉईंट खूप कमी असतो. तुम्ही हे सॅलड किंवा मॅरिनेट करण्यासाठी वापरू शकता.