scorecardresearch

Premium

पांढरी की तपकिरी कोणत्या रंगाची अंडी खरेदी करणे आहे फायद्याचे? वेगळा रंग का असतो व त्याचा अर्थ काय?

Eggs Hacks: एक नेहमीच चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे अंड्याच्या कवचाचा रंग पांढरा असणे उत्तम आहे की तपकिरी? मुळात हा रंगाचा फरक कशामुळे होतो व त्याचा पोषणाशी काय संबंध आहे हे आपण जाणून घेऊया.

White or Brown Eggs Which Is Better In Nutrition Why Egg Shells Has Different Colour What Does It Mean Which eggs Are perfect
अंडी पांढरी की तपकिरी? तुमचा फायदा कशात? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

White or Brown Eggs Which Is Better: अंड्यातील प्रथिने, जीवनसत्व शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक असतात जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. यापूर्वी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. सम्राट शाह यांनी सांगितले की, आठवड्यातून सात अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठरू शकते. पण अंड्याचा शरीरावर कसा प्रभाव होतो हे व्यक्तिपरत्वे बदलू शकते. अंड्याच्या सेवनाच्या जशा अनेक पद्धती आहेत तसे सेवनाशी जोडलेले अनेक समज- गैरसमज सुद्धा आहेत. यातील एक नेहमीच चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे अंड्याच्या कवचाचा रंग पांढरा असणे उत्तम आहे की तपकिरी? मुळात हा रंगाचा फरक कशामुळे होतो व त्याचा पोषणाशी काय संबंध आहे हे आपण जाणून घेऊया..

अंड्याच्या टरफलाचा रंग वेगवेगळा का असतो?

तपकिरी आणि पांढर्‍या अंड्यांमधला रंगाचा फरक पूर्णपणे वरवरचा असतो आणि तो कोंबडीच्या प्रजातीनुसार ठरवला जातो. तपकिरी अंडी सामान्यत: ऱ्होड आयलँड रेड्स किंवा प्लायमाउथ रॉक्स सारख्या प्रजातींच्या कोंबड्यांची असतात तर पांढरी अंडी सामान्यतः लेघॉर्नसारख्या प्रजातींच्या कोंबड्यांची असतात. अंड्याच्या टरफलाचा रंग पौष्टिक गुणवत्तेशी संबंधित नाही.

Trick For Lemon Tree Add turmeric water to the root of a lemon tree, the plant will get lots of lemons throughout the year
Trick For Lemon Tree: लिंबाच्या रोपाच्या मुळाशी टाका ‘या’ गोष्टी, वर्षभर रोपाला येतील भरपूर लिंबू
how to make moringa curry recipe in marathi
Recipe : शेवग्याच्या शेंगांपासून बनवा पौष्टिक ‘शेकटवणी’; पाहा या आंबट-गोड पदार्थाचे प्रमाण अन् रेसिपी
Lagna Vidhi Marathi importance of akshata in wedding ceremony in marathi what is the meaning of marathi word akshata
शुभ मंगल सावधान! लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात? अक्षता शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
30 Days Shani Surya To Made Massive Changes In Three Rashi Will Earn More Money But These Two Rashi Danger Bells Astrology
३० दिवस शनीच्या राशीत सूर्य चमकणार, ‘या’ ३ राशी होतील मालामाल, तर ‘दोन’ राशींनी ओळखा धोक्याची घंटा

पौष्टिक मूल्ये

पौष्टिकदृष्ट्या, तपकिरी आणि पांढऱ्या दोन्ही अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे तुलनेने समसमान असतात. दोन्ही प्रकारची अंडी व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन, सेलेनियम आणि कोलीन सारखे आवश्यक पोषक प्रदान करतात, हे चांगले आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. दोन प्रकारच्या अंड्यांमधील चव किंवा पौष्टिक मूल्यांमधील फरक कमी आहे आणि रंगाचा एकूण फायद्यांवर लक्षणीय परिणाम होत नाही.

जितका जास्त खर्च, तितकं जास्त पोषण?

एक सामान्य गैरसमज असा आहे की तपकिरी अंडी आरोग्यदायी असतात कारण त्यांची किंमत जास्त असते. हा गैरसमज आहे. तपकिरी अंडी देणार्‍या प्रजाती च्या कोंबड्या आकाराने मोठ्या असतात आणि त्यांच्यासाठी जास्त खाद्य आवश्यक असते, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढतो यामुळे या अंड्यांची किंमत जास्त असते. किमतीतील फरक हा पोषणाशी संबंधित नाही.

हे ही वाचा<< परिणीती चोप्राचं तासाला १००० कॅलरीज बर्न करणारं ‘कलरीपयट्टू’ रुटीन तुम्हीही करू शकता, डॉक्टरांनी सांगितलं कशी होते मदत?

कोंबड्यांच्या आहाराचे आणि राहणीमानाचे महत्त्व

अंड्याच्या पौष्टिक गुणवत्तेवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे कोंबड्यांचा आहार आणि राहणीमान. मोकळ्या वातावरणात वाढवलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात असू शकते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या कोंबड्या सूर्यप्रकाशात वावरू शकतात त्यांच्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण तिप्पट ते चौपट जास्त असते. हा मुद्दा तपकिरी आणि पांढर्‍या दोन्ही अंड्यांना लागू होतो आणि हे कवचाच्या रंगापेक्षा कोंबडीच्या जीवनशैली आणि आहारावर आधारित आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: White or brown eggs which is better in nutrition why egg shells has different colour what does it mean which eggs are perfect svs

First published on: 07-12-2023 at 15:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×