Fungal Infections Symptoms, Causes & Precautions : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रोगजनक बुरशीच्या संसर्गाची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. हे फंगल इन्फेक्शन्स वेगाने वाढत असून मुख्य म्हणजे यावर अद्याप कोणतीही औषधे आराम देण्यासाठी सक्षम नाहीत. या यादीत अत्यंत धोकादायक अशा १९ बुरशीच्या प्रकारांचा समावेश आहेत. यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याचे अंदाज जागतिक आरोग्य संस्थेने वर्तवला आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, या वाढत्या संसर्गाचे निदानही त्वरित होत नाही व निदान झाल्यावरही यावर ठोस उपचार पद्धती उपलब्ध नाहीत. त्यामुळे वेळीच लक्ष न दिल्यास, स्वच्छता बाळगून आवश्यक काळजी न घेतल्यास बुरशीच्या संसर्गाचे गंभरर परिणाम भोगावे लागू शकतात.

बुरशीजन्य रोगांचे तीन प्रमुख प्रकार

जागतिक आरोग्य संघटनेच्या बुरशीच्या संसर्गाच्या यादीला तीन भागात विभागण्यात आले आहे. यामध्ये गंभीर, उच्च व प्राधान्य गट बनवण्यात आले आहेत.

  • गंभीर गटामध्ये अत्यंत औषध-प्रतिरोधक बुरशी कॅन्डिडा ऑरिस, क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स, एस्परगिलस फ्युमिगेटस आणि कॅन्डिडा अल्बिकन्स यांचा समावेश आहे.
  • उच्च प्राधान्य गटामध्ये कॅन्डिडा प्रजातीतील इतर अनेक बुरशी तसेच म्युकोरेल्स सारख्या बुरशींचा समावेश आहे, कोविड-19 दरम्यान आपण काळ्या बुरशीच्या संसर्गाविषयी आपण ऐकले असेल. म्युकोरेल्स हा त्याच गटातील बुरशीचा संसर्ग आहे.
  • मध्यम प्राधान्य गटामध्ये कोक्सीडिओइड्स एसपीपी आणि क्रिप्टोकोकस गॅटीई यांचा समावेश आहे.

AMR ग्लोबल कोऑर्डिनेशन विभाग व जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. Haileyesus Getahun यांच्या माहितीनुसार, “बुरशीजन्य संसर्गाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अद्याप अभ्यास सुरु असून अधिक माहिती समोर येण्याची गरज आहे. या बुरशीजन्य संसर्गांचा अभ्यास सध्या प्राधान्याने केला जात आहे. बुरशीजन्य संसर्ग आणि अँटीफंगल प्रतिरोधकांबद्दल माहिती मिळेपर्यंत सर्वांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ” याच पार्श्वभूमीवर अनेक देशांना आपल्या वैद्यकीय प्रयोगशाळा सक्षम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Uric Acid: युरिक ऍसिडमुळे शरीराला सूज, छातीत जळजळीचा धोका; आयुर्वेदातील ‘हा’ नामी उपाय पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुरशीच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला?

बुरशीजन्य संसर्ग गंभीरपणे आजारी असलेल्या व रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांवर परिणाम करू शकतात. याशिवाय, कर्करोग, एचआयव्ही/एड्स, अवयव प्रत्यारोपण, श्वसन रोग, आणि प्राथमिक क्षयरोगाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्यांना बुरशीजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो.