प्रत्येकाला आपले ओठ सुंदर दिसावेत असं वाटत. मुलींसाठी तर ओठ म्हणजे जीव की प्राण असतात. शिवाय ओठांची काळजी घेण्यासाठी आणि ते उठून दिसावेत यासाठी त्या सतत वेगवेगळे उपाय करतात, यासाठी त्या महागड्या लिपस्टिक वापरतात. या लिपस्टिक वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असतात. शिवाय प्रत्येकाला आपले ओठ उठावदार लाल किंवा गुलाबी दिसावेत असं वाटतं.

लाल ओठांवर हिंदी सिनेमांमध्ये अनेक गाणीदेखील आहेत. मात्र, आपले ओठ हे गुलाबी किंवा लालच का असतात ते आपल्या शरीराच्या इतर त्वचेच्या रंगाचे का नसतात यामागचे कारण तुम्हाला आहे का? माहिती नसेल तर तुम्हाला आज याबाबतची माहिती आम्ही देणार आहोत. आपल्या ओठांचा रंग लाल किंवा गुलाबी का असतो या प्रश्नाचे उत्तर इंग्लंडच्या लोबोरो विद्यापीठातील मानवी जीवशास्त्राचे प्राध्यापक नोएल कैमरॉन यांनी सागंतिलं आहे. ते जाणून घेऊया.

हेही वाचा- काही लोकांचे पाय नेहमी थंड का असतात? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरते सोबत असू शकतात ‘ही’ ५ गंभीर कारणे

लाइव्ह सायन्सच्या एका अहवालानुसार, ओठांची त्वचा शरीराच्या त्वचेपेक्षा खूपच पातळ आणि संवेदनशील असते. ओठांच्या त्वचेच्या मागे लाखो रक्तवाहिन्या असतात ज्या लाल रंगाच्या असतात. त्यांच्यामुळेच ओठांचा रंग लाल दिसत असल्याचं अहवालात सांगितलं आहे.

ओठांचा रंग शरीराच्या इतर त्वचेपेक्षा भिन्न का?

आपल्या ओठांचा रंग हा आपल्या शरीराच्या त्वचेच्या रंगासारखे का नसतात. यामागचे कारण प्राध्यापक नोएल कैमरॉन सांगतात की, आपल्या चेहऱ्याच्या त्वचेमध्ये पेशींचे १६ थर असतात, तर ओठांवर हे थर केवळ ३ ते ४ थर असतात. त्यामुळे त्यांचा रंग हलका असतो. याशिवाय त्वचेच्या रंगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिलेनोसाइट्स संख्या ही ओठांच्या त्वचेवर कमी असते. त्यामुळे शरीराच्या इतर भागातील त्वचेसारखा रंग ओठांना मिळत नाही.

हेही वाचा- सफरचंद, बटाटे कापल्यानंतर काळे का पडतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

प्रोफेसर नोएल यांच्या मते, ओठ अनेक महत्त्वाची काम करतात. त्यामध्ये जेवणं, पाणी पिणं यासह ओठ आपणाला श्वास घेण्यासही मदत करतात. याशिवाय आपण बोलतानाही ओठ फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर समजेल की ज्यावेळी तुम्ही काही बोलता तेव्हा तुम्ही फक्त ओठांच्या स्नायूंच्या हालचालीने बोलू शकता. ओठांचे स्नायू तुम्हाला बोलण्यात मदत करतात

हेही वाचा- सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिताय का? मग एकदा त्याचे ‘हे’ नेमके परिणाम जाणून घ्या

बोलण्यासाठी कशी होते ओठांची मदत ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोलताना तुम्ही जर P या शब्दाचा उच्चार केला तर तुमच्या लक्षात येईल की यासाठी दोन्ही ओठांमध्ये हालचाल होते. शिवाय तुम्ही जर F चा उच्चार केला तर तुमच्या ओठांसह दातांमध्ये हालचाल होते. जर ओठांमध्ये स्नायू नसतील तर माणसाला बोलणं, अन्न खाण्यासही कोणतेही पेय पिणे कठीण होऊ शकतं. त्यामुळे ओठ हा आपल्या शरीराचा महत्वाचा आणि आपल्या सौंदर्यामध्ये भर घालणारा अवयव आहे.