दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे सर्वांना माहीत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी दूध पिणं फायदेशीर आहे. गाय किंवा म्हशीचे कच्चे दूध असेल, तर ते गरम करूनच प्यायले जाते. पण ‘पॅकेट’ किंवा ‘कार्टन’मध्ये असेलेले पाश्चराइज्ड दूध वापरताना गरम करावे की नाही हा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो. आजी किंवा आईच्या मनात वर्षानुवर्ष घोळणाऱ्या याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संपर्क साधला.

पाश्चराइज्ड केलेले दूध पिण्याआधी गरम करावे का?

याबाबत माहिती देताना हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील केअर हॉस्पिटलच्या क्लिनिकल डाएटीशियन असलेल्या जी. सुषमा सांगतात की, पाश्चराइज्ड दूध गरम करण्याची किंवा उकळून पिण्याची आवश्यकता नाही. पाश्चराइज्ड दूध तयार करताना ते चांगले उकळवले जाते आणि त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट केले जातात. उलट, पाश्चराइज्ड दूध गरम केल्याने त्यातील पोषण मूल्य आणखी कमी होतात.

दुकानात मिळणारे पाश्चराइज्ड दूध हे थेट पिणे सुरक्षित आहे; पण त्याची मुदत संपल्याची तारीख तपासून घ्या. तसेच दुधाचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी दुकानात ते योग्य तापमानाला ठेवले आहे का हेदेखील तपासून घ्या. दुधाचे शेल्फ लाइफ म्हणजे ते किती दिवस पिण्यास योग्य आहे हे दर्शवते.

‘पॅकेट’ किंवा ‘कार्टन’मध्ये असलेले पाश्चराइज्ड दूध हे स्वयंपाकघरात रोजच्या रोज वापरले जाते. इंटरनेट हे माहिती मिळवण्याचे चांगले साधन आहे. पण अर्थातच, आपण जे काही शिकतो, त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता कामा नये. थोडं शंकानिरसन करीतच त्यावर विश्वास ठेवावा.”

उकळलेले पाश्चराइज्ड दूध प्यायल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो का?

सुषमा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, उकळल्यानंतर दुधाची चव आणि पोत (टेक्श्चर) बदलू शकते. उकळलेले पाश्चराइज्ड दूध (Boiled pasteurized milk) प्यायल्याने शरीरावर कोणता हानिकारक परिणाम होतो ते अजून तरी समोर आलेले नाही.
तरी दुधातील प्रथिनांची रचना बदलल्याने ते पचवणे अवघड होऊ शकते. प्रथिनांचे पोषण मूल्य गमावल्यानंतर शरीराला त्याचे विघटन करणे अवघड जाते आणि टाकाऊ घटक वाढण्यास कारणीभूत ठरते.

त्यामुळे शरीरात दाह (inflammation) निर्माण होतो आणि पचनासंबंधित समस्या जाणवतात. पाश्चराइज्ड दुधामध्ये असलेल्या कॅल्शियमची गुणवत्तादेखील निकृष्ट होते आणि त्यामुळे मूत्रापिंडात खडे धोका होण्याचा धोका वाढतो.

उकळलेले पाश्चराइज्ड दूध पिणे कोणी टाळावे? (Who should avoid drinking such milk?)

सुषमा यांच्या मतानुसार, एखादी व्यक्ती ज्याला दुधातील प्रथिनांची अ‍ॅलर्जी आहे किंवा त्रास होतो अशा लोकांनी आणि ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स (lactose intolerance) असलेल्या लोकांनी पाश्चराइज्ड दूध पिणे टाळावे.

जर तुम्हाला डॉक्टरांना दूध न पिण्याचा सल्ला दिला असेल किंवा ज्यांची आधीपासूनच गॅलेक्टोसेमियाची (Galactosemia) आरोग्यस्थिती असेल आणि ती आणखी बिघडत असेल, तर अशा लोकांनी हे दूध पिणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ज्यांची संवेदनशील पचनसंस्था (sensitive digestive System) असेल म्हणजेच तुमच्या पचनसंस्थेतील अवयवांना काही विशिष्ट पदार्थ किंवा परिस्थितीमुळे सहजपणे त्रास होत असेल, तर अशा लोकांना दुधात असलेले प्रथिने पचवण्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी असे दूध पिणे टाळावे.