उन्हाळ्यासोबत आता आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. उन्हाळ्यात चवदार, स्वादिष्ट आंबा खाण्याची एक वेगळीच मजा असते. आंबा हे असे फळ आवडत नाही असे फार कमी जण असतील. आंब्याच्या चवीमुळे खाताना एक मनशांती मिळते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आंबा खायला आवडतो. पण घरातील वृद्ध आजी, आई अनेकदा आंबा पाण्यात भिजवून मग खा असे सांगताना दिसतात. पण आंबा पाण्यात भिजवूनचं का खाल्याला जातो? यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहित तर ती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आंबा खाण्यापूर्वी तो पाण्यात का भिजवावा?

लहानपणापासून आंबा खाण्यापूर्वी आई, वडील पाण्यात काहीवेळ भिजवत ठेवून मग आपल्याला खायला देताना पाहिल असेल. पण आंबा खाण्यापूर्वी भिजवण्यामागे केवळ रसायने, घाण आणि धूळ काढणे एवढाच उद्देश नसतो. तो धुवून न घेतल्यास त्याची गुणवत्ता आणि चवही खराब लागते.

उष्णता कमी करण्यास मदत होते.

आंब्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे शरीराच्या कार्यावर परिणाम करतात. यात आंब्यात फार उष्णता असते आणि उन्हाळ्यातील उष्णतेत तुम्ही आंबे खाता तेव्हा तुमच्या शरीरातही उष्णता वाढते. ज्यामुळे पचनसंस्था आणि आतड्यांवर परिणाम होऊ शकतो. पण आंबे भिजवल्याने त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते, तसेच बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी आणि जुलाब यांसारख्या समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे आंबा अर्धा तास पाण्यात भिजवल्यास थर्मोजेनिक गुणधर्मही कमी होतात.

मातीचं मडकं की, रेफ्रिजरेटर? उन्हाळ्यात कशात पाणी साठवून ठेवणे ठरेल फायदेशीर

विविध आजारांपासून संरक्षण होते

कीटक, तण आणि विविध जंतूंपासून आंब्याच्या झाडाचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके आणि रसायनांची फवारणी केली जाते, या रसायनांचा आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. कारण कीटकनाशकांमुळे त्वचेची जळजळ, मळमळ, श्वसनमार्गात जळजळ, ऍलर्जी, कर्करोग आणि डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

आंबा भिजवून ठेवल्याने त्याच्या देटावरील चिटकपणा निघून जातो. आंब्याच्या देठावर पांढऱ्या रंगाचा एक चिकट पदार्थ बाहेर येतो ज्यामध्ये फायटिक एॅसिड असते, यामुळे आंब्याची चव वेगळी लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबा पाण्यात नक्की किती वेळ भिजवायचा?

आंबे पाण्यात साधारण १५ ते २० मिनिटे भिजवून खावे. यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते. जर आंबा न भिजवताच खाल्ला तर पोटाचे विकार वाढू शकतात.