भगवान शंकराच्या पूजेसाठी सावन महिना सर्वोच्च मानला जातो. यावर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरु होईल आणि २७ ऑगस्टला समाप्त होईल. दरम्यान १ तारखेला श्रावणातील पहिला सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार ८ ऑगस्ट, तिसरा १५ ऑगस्ट, आणि चौथा श्रावणी सोमवार २२ ऑगस्टला असेल. या चार श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या महिन्यात बहुतेक लोक मांसाहारापासून दूर राहतात. घरातील वडीलधारी मंडळी श्रावणात मांसाहार न करण्याचा सल्ला देतात आणि आपणही ते कोणताही युक्तिवाद न करता पाळतो. मात्र श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे धार्मिक तसेच शास्त्रीय कारणे देखील आहेत. आज आपण जाणून घेऊया, श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावे आणि यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी

  • कमकुवत पचनशक्ती

पावसामुळे हवामानात आर्द्रता असते, त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो आणि ती कमजोर होते. शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो. पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे मांसाहार आतड्यांमध्ये सडायला लागतो आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

  • अन्नपदार्थ लवकर खराब होतात

श्रावण महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे वातावरणात बुरशी आणि त्याचे संक्रमण वाढू लागते. पावसाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम मांसाहारावर होतो. सूर्यप्रकाशाची कमतरता आणि आर्द्रता यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात.

  • पावसाळ्यात प्राणीही आजारी पडतात

पावसाळ्यात कीटकांची संख्या वाढते, त्यामुळे अनेक आजार होतात. प्राणी अनेकदा तृणधान्य खातात आणि पावसाळ्यात ते अनेक प्रकारचे कीटक देखील खातात, ज्यामुळे ते आजारी पडतात आणि मांसाहारी अन्न खाल्ल्याने हा संसर्ग मनुष्यापर्यंत पोहोचू शकतो.

श्रावण सोमवारी व्रत करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या उपवासासाठीचा हेल्दी डाएट प्लान

  • पावसाळ्यात मासे अंडी देतात

पावसाळ्यात सीफूड खाणे देखील हानिकारक असू शकते, कारण यावेळी मासे अंडी घालतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यावेळी सीफूड खाणे योग्य नाही, कारण त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

  • जलद पचणारे अन्न खावे

पावसाळ्यात उशिरा पचणारे अन्न खाऊ नये. नये, कारण पोटात अन्न लवकर पचले नाही तर ते आतड्यांमध्ये सडायला लागते आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मांसाहार पचायला जड असतो, त्यामुळे या ऋतूत जलद पचणारे अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why should we avoid meat in the month of shravan know the scientific reasons behind this pvp
First published on: 26-07-2022 at 12:41 IST