Always Wash Eggs Before Cooking: ग्राहक म्हणून आपण अंड्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या बाबतीत अनेकदा दुर्लक्ष करतो. दुकानातून पॅक केलेली अंडी ही सहसा निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ केली जातात. तसंच स्थानिक विक्रेत्यांकडून किंवा बाजारातून खरेदी केली अंडी कोणत्याही निर्जंतुकीकरणाशिवाय थेट शेतातून येतात असे म्हटले जाते. याचाच अर्थ त्यांना बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका असू शकतो. म्हणूनच डॉक्टर अंडी खाण्यापूर्वी स्वच्छ करून घेण्याचा सल्ला देतात. कारण त्यावर घाण आणि पिसांमधील जंतू किंवा त्यांचे अंश असू शकतात. ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात.
डॉ. अंजना कालिया यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “स्थानिक विक्रेत्यांकडून किंवा खुल्या बाजारातून खरेदी केलेली अंडी धुवून वापरणे महत्त्वाचे आहे. कारण ही अंडी गोळा केल्यानंतर अनेकदा त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात नाही.”
अंडी का धुतली पाहिजे?
व्यावसायिकरित्या पॅक केलेली अंडी धुणे किंवा निर्जंतुकीकरण प्रक्रियेतून जातात. स्थानिक विक्रेत्यांकडे असलेल्या अंड्यांच्या कवचावर घाण, पिसे किंवा अगदी विष्ठेचे अंश असू शकतात. तुम्ही जर बऱ्याचदा पाहिले तर काळे, हिरवे असे डाग अंड्यांवर असतात.
डॉ. कालिया सांगतात की, “अंड्याचे बाह्य कवच कठीण असले तरी ते छिद्रयुक्त असते आणि योग्यरित्या हाताळले नाही तर ते बॅक्टेरिया आत येऊ शकतात. स्वयंपाक करण्यापूर्वी ते वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने धुतल्याने पृष्ठभागावरील बॅक्टेरिया तुमच्या हातांमध्ये, भांड्यांमध्ये किंवा अन्नामध्ये पसरण्याचा धोका कमी होतो.”
जीवाणूंचा संसर्ग टाळणे
कोणत्याही संसर्गाचा धोका टाळला पाहिजे हे सांगताना डॉ. कालिया यांनी स्पष्ट केले की, “अंड्याच्या कवचांवर आढळणारे सर्वात सामान्य जीवाणू, जे स्थानिक किंवा बाहेरील स्त्रोतांमधून येणारे साल्मोनेला, ई कोलाई आणि कॅम्पिलोबॅक्टर असे आहेत.”
“हे जीवाणू सहसा पक्ष्यांच्या विष्ठेच्या संपर्कातून, घरट्यातील दूषित पदार्थांच्या संपर्कातून किंवा वाहतुकीदरम्यान अस्वच्छ हाताळणीतून येतात. जर हे अंड्याच्या आतल्या किंवा स्वयंपाकाच्या संपर्कात आले तर गंभीर आजार निर्माण करू शकतात. त्यामुळे पोटदुखी, अतिसार किंवा ताप यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. अशावेळी अंडी स्वच्छ धुणे आणि स्वच्छतापूर्ण हाताळणी हे अत्यंत महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत”, असे तज्ज्ञांनी सांगितले.
“दुकानातून घेतलेली अंडी किंवा पॅक केलेली अंडी ही साधारणपणे विक्री करण्यापूर्वी स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि ग्रेडिंगसहउच्च गुणवत्ता नियंत्रण उपायांमधून जातात, असे डॉक्टरांनी सांगितले. “ही अंडी नियंत्रित तापमान परिस्थितीत साठवली जाता, त्यामुळे त्यांच्यावरील बॅक्टेरिया वाढत नाहीत. दुसरीकडे, स्थानिक विक्रेत्यांकडे असलेली अंडी अधिक ताजी असू शकतात, मात्र ती न धुता आणि सभोवतालच्या तापमानात साठवली जातात. त्यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा आणि वाढण्याचा धोका वाढतो. शिवाय खुल्या बाजारपेठेतील हाताळणी आणि वाहतूक पद्धती स्वच्छतेच्या मानकांना पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे सुरक्षिततेची चिंता याबाबतीत आणखी वाढते”, असे डॉ. कालिया यांनी स्पष्ट केले.
