Fruits for dry skin: हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून गरम स्वेटर घालतो आणि गरम चहाचा आस्वाद घेतो. पण, हिवाळ्यात आपल्या त्वचेलाही त्रास होत असतो. कोरडेपणा, चेहऱ्यावरील चिकटपणा, चेहऱ्याचा तेज कमी होणे यासारख्या समस्यांबद्दल बरेच लोक चिंता करत असतात. पण, निसर्गाने दिलेले फळे हिवाळ्यातील त्वचेसाठी एक अप्रतिम उपाय ठरू शकतात. जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक हायड्रेशनने समृद्ध असलेली फळे त्वचेचे पोषण करण्यासाठी आणि तिची चमक टिकवून ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहेत. चला तर मग पाहूया, हिवाळ्यात त्वचेला तजेलदार, निरोगी आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी कोणती ५ फळे खाणे आवश्यक आहे.

१. संत्री

कोरडेपणा आणि चेहऱ्याचा फिकट रंगावर नियंत्रण ठेवण्यासाठी संत्री सर्वोत्तम फळ आहे. व्हिटॅमिन C ने भरपूर असलेले संत्रे त्वचेला कोलाजेन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेची लवचिकता आणि घट्टपणा टिकून राहतो. हिवाळ्यात प्रदूषणामुळे त्वचेवर येणारा ताण कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी नैसर्गिक कवच म्हणून काम करते. रोज एक संत्री खाल्ल्याने किंवा सकाळी ताजे संत्र्याचे रस प्यायल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि डार्क स्पॉट्स कमी होतात.
शुक्र कन्या राशीत

२. डाळिंब

हिवाळ्यात भारतीय घरांमध्ये डाळिंब हे खूप लोकप्रिय फळ आहे. अँटिऑक्सिडंट्सने भरलेले, डाळिंब त्वचेच्या वृद्धत्वाशी लढते आणि खराब झालेल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त करते. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेला नैसर्गिक रंग आणि तेज प्राप्त होते. डाळिंब खाल्ल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते आणि हिवाळ्यातील कोरडेपणा कमी होतो.

३. पपई

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असतात, जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि ताजी त्वचा प्रकट करतात. जीवनसत्त्वे A,C आणि E ने समृद्ध असते , पपई त्वचेला पुनरुज्जीवित करते आणि हिवाळ्यातील कोरडेपणा कमी करते.पपई खाल्ल्याने त्वचा मऊ राहते आणि आर्द्रता संतुलित राहते.

४. पेरू

पेरूमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण संत्र्यापेक्षा चारपट जास्त आहे.हिवाळ्यात त्वचा फिकट आणि थकलेली दिसते, परंतु पेरू खाल्ल्याने त्वचा ताजी आणि चमकदार राहते. यामध्ये असलेले लायकोपीन त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करते आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तिचे संरक्षण करते.

५. मोसंबी

मोसंबी हे हिवाळ्यातील प्रसिद्ध फळ आहे. नैसर्गिक साखर आणि व्हिटॅमिन C ने भरलेले मोसंबी त्वचेला आतून हायड्रेट करते आणि त्वचा निरोगी ठेवते. दररोज ताज्या मोसंबीचा रस पिल्याने त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहते.

हिवाळ्यात फळे खाणे फक्त आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही एक नैसर्गिक उपचार आहे. रोज हे पाच फळे आपल्या आहारात समाविष्ट केल्यास हिवाळ्यातही त्वचा तजेलदार आणि जीवन्त राहते.