Winter Vegetables for Uric Acid: थंडीचा मोसम आला की शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांची क्रेविंग वाढते. पण, या सवयीमुळेच शरीरात युरिक अॅसिड झपाट्याने वाढू शकतं. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव हे सर्व मिळून युरिक अॅसिड वाढवतात. एकदा हे अॅसिड वाढलं की सांधे दुखणे, सूज, थकवा आणि किडनीचे आजार यांसारख्या समस्या सुरू होतात. पण, आयुर्वेदात एक अशी भाजी सांगितली आहे जी नैसर्गिक औषध म्हणून काम करते आणि शरीरातील हे अॅसिड नियंत्रित ठेवते.
युरिक अॅसिड वाढतं कसं?
डॉक्टरांच्या मते, प्युरिन या घटकाचं प्रमाण शरीरात जास्त झालं की युरिक अॅसिड वाढतं. मटण, रेड मीट, समुद्री मासे, दारू, बिअर, जंक फूड, प्रोसेस्ड पदार्थ, साखरेचे पदार्थ आणि फ्रुक्टोज असलेले पेये हे सगळं युरिक अॅसिडचं प्रमाण वाढवतं. त्याशिवाय प्रोटीनयुक्त कडधान्यं जसं की सोयाबीन, हरभरा, राजमा, मसूर, मूग यांचं अति सेवनसुद्धा या समस्येला निमंत्रण देतं.
कोणती भाजी आहे युरिक अॅसिडवर प्रभावी?
आचार्य बालकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, मुळा म्हणजे हिवाळ्याचं नैसर्गिक औषध. यामध्ये डायुरेटिक गुणधर्म असतात. म्हणजेच शरीरातील विषारी द्रव्यं आणि अतिरिक्त युरिक अॅसिड मूत्रावाटे बाहेर टाकण्याची क्षमता या भाजीत असते.
मुळा किडनीचं कार्य सुधारतो, रक्त शुद्ध करतो आणि सांध्यांमधील वेदना व सूज कमी करतो.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, मुळ्यामध्ये प्युरिनचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्यात असतात फायबर, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, आयर्न, अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल घटक, जे शरीर शुद्ध करण्याचं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात.
किडनी आणि रक्तासाठी अमृतासारखा मुळा
मुळ्याचं नियमित सेवन केल्याने किडनी डिटॉक्स होते, म्हणजेच शरीरातील अपायकारक घटक लघवीद्वारे बाहेर पडतात. यामुळे शरीरात जमा झालेलं युरिक अॅसिड कमी होतं, परिणामी सांधेदुखी, सूज आणि थकवा यातून लवकर आराम मिळतो. आयुर्वेदात मुळ्याला “रक्तशोधक” आणि “कफनाशक” म्हटलं गेलं आहे. हिवाळ्यात जेव्हा थंडीमुळे शरीर सुस्त होतं, तेव्हा मुळा खाल्ल्याने शरीराला उष्णता आणि ताकद दोन्ही मिळतात.
मुळा खाण्याचे उत्तम मार्ग
- मुळ्याची भाजी बनवून खा, ही पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.
- सकाळी रिकाम्या पोटी मुळ्याचा रस (ज्यूस) प्यायल्याने यकृत आणि किडनी दोन्ही तंदुरुस्त राहतात.
- सॅलेडमध्ये कच्चा मुळा खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.
अजूनही काही जबरदस्त फायदे
- मुळा डायबिटीस कंट्रोल करतो, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
- हृदयाचं आरोग्य सुधारतो आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटवतो.
- शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकतो आणि त्वचा उजळवतो.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवून सर्दी, खोकला आणि थकवा यापासून बचाव करतो.
थंडीचा राजा ‘मुळा’
हिवाळ्यात मिळणारा हा पांढऱ्या रंगाचा चमत्कारिक मुळा म्हणजे निसर्गाने दिलेलं सर्वात प्रभावी डिटॉक्स फूड आहे.
ज्यांना युरिक अॅसिड, सांधेदुखी, किडनीचे त्रास किंवा शरीर सुजण्याची समस्या आहे, त्यांनी या थंडीमध्ये दररोज मुळ्याचं सेवन करावं.
मुळा म्हणजे एक अशी भाजी, जी शरीरातील ‘विष’ साफ करते आणि रक्त, किडनी, सांधे सगळं निरोगी ठेवते. त्यामुळे या हिवाळ्यात आपल्या आहारात ‘मुळा’ नक्की जोडा आणि अनुभव घ्या नैसर्गिक आरोग्याचा…
