हिवाळ्यात त्वचेच्या समस्येनुसार खरेदी करा ‘हे’ फेस सीरम!

लोकं चुकीचे सीरम वापरतात, ज्यामुळे चेहऱ्याला जास्त नुकसान होते. अशा स्थितीत त्वचेच्या समस्येनुसार सीरम वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

lifestyle
कोरड्या त्वचेसाठी हायलुरोनिक ऍसिड सीरम वापरणे चांगले. (photo: indian express)

जर तुम्ही हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्यासाठी फेस सीरम घेण्याचा विचार करत असाल तर ते वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचेची समस्या काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला त्वचेची काळजी घेताना कोरडेपणाची समस्या भेडसावत असेल तर तुम्हाला विशेष प्रकारचे सीरम वापरावे लागेल, तर जर तुम्हाला अचानक तुमच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरुम येत असतील तर तुम्हाला यासाठी वेगळे सीरम खरेदी करावे लागेल.

अनेक वेळा लोकं चुकीचे सीरम वापरतात, ज्यामुळे चेहऱ्याला जास्त नुकसान होते. अशा स्थितीत त्वचेच्या समस्येनुसार सीरम वापरणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्वचेनुसार कोणते फेस सीरम वापरावे.

त्वचेनुसार फेस सीरम निवडा

पुरळ त्वचेसाठी

जर तुमच्या त्वचेवर पुरळ असेल तर त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मुरुमांची समस्या सहसा तेलकट त्वचेवर असते. या प्रकरणात आपण सॅलिसिलिक ऍसिड सीरम वापरावे. याच्या वापराने तुमची त्वचा तेलमुक्त राहते. सॅलिसिलिक ऍसिड देखील त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे मृत त्वचा त्वचेतून सहज बाहेर येते आणि चेहरा उजळ दिसतो.

निस्तेज त्वचेसाठी

हिवाळ्यात, जर तुमचा चेहरा निस्तेज झाला असेल आणि चमक अजिबात येत नसेल तर त्वचा ताजे दिसण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले सिरम वापरा. व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने चेहऱ्यावर चमक येईल.

एजिंग आणि फाइन लाइन्स

चेहऱ्यावर म्हातारपण दिसत असेल आणि बारीक रेषा दिसू लागल्या असतील तर तुम्ही नियासिनमाइड सिरम वापरा. नियासिनमाइड सीरम वापरल्याने कोलेजन वाढतो, ज्यामुळे त्वचा घट्ट होते आणि त्वचा तरुण दिसते.

कोरड्या त्वचेसाठी

कोरड्या त्वचेसाठी हायलुरोनिक ऍसिड सीरम वापरणे चांगले. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि चेहऱ्याची नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. याच्या वापराने कोरड्या आणि निर्जीव त्वचेवर चमक येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Winter skin care face serum according to your skin problem scsm

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या