Wisdom Teeth Pain Home Remedies: जेव्हा तोंडाच्या कोपऱ्यात असलेली अक्कल दाढ वाढू लागते तेव्हा वेदना खूप वाढू लागतात. वय वाढत जातंं त्याप्रमाणे जबड्यामध्ये हिरड्यांमध्ये ही दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसते. ज्यामुळे तिला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. म्हणूनच अक्कल दाढ येताना प्रचंड वेदना होतात. कधी-कधी ही वेदना इतकी वाढते की माणसाची शांतता आणि आराम हिरावून घेते. अक्कल दाढेच्या दुखण्यामुळे हिरड्या फुगायला लागतात, काही वेळा रक्तही येऊ लागते. अशा परिस्थितीत दाढ पूर्णपणे काढून टाकणे हा एकच उपाय आहे, परंतु जर तुमच्या जवळ डेंटल क्लिनिक नसेल आणि दुखण्यापासून त्वरित आराम हवा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
१. आईस्क्रीम
जेव्हा शरीरात दुखापत होते तेव्हा त्या जागी बर्फाचे गोळे ठेवले जातात. दातांसाठीही हा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी कापडात बर्फाचे छोटे तुकडे ठेवून गालावर हलक्या हाताने फिरवा. वेदनेपासून मुक्त होण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे.
२. मीठाच्या पाण्याने गुळण्या करा
मीठ हे दातांसाठी उत्कृष्ट औषध मानले जाते, जेव्हा अक्कल दाढेचे दुखणे असह्य होते तेव्हा मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे लगेच वेदना कमी होतात.
आणखी वाचा : गिफ्ट किंवा वारसाने मिळालेल्या शेअर्सवर TAX भरावा लागेल, नक्की कुणाला भरावा लागेल, जाणून घ्या
३. लवंग तेल
तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग खूप फायदेशीर मानली जाते. वेदना आणि सूज यांवर लवंग रामबाण औषधापेक्षा कमी नाही. अक्कल दाढेच्या समस्येसाठी, लवंगाचे तेल कापसाच्या बोळ्यामध्ये लावा आणि तो बोळा दाढेमध्ये काही काळ पकडून ठेवा. यामुळे वेदना आणि सूज दोन्ही दूर होतील.
४. हळद
हळद अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. कारण त्यात जंतुनाशक आणि दाहकता कमी करणारे गुणधर्म आहेत. अक्कल दाढेचा त्रास दूर करण्यासाठी हळद मीठ आणि मोहरीची पेस्ट तयार करा नंतर ही पेस्ट गिळण्यात येणार नाही याची काळजी घेऊन ती अक्कल दाढेवर लावा.